शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडला डावलणे अन्यायकारक

By admin | Updated: September 23, 2015 03:38 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे पहिल्या तीन क्रमांकांत असतानाही केवळ पुण्याचा समावेश करून पिंपरी-चिंचवड शहर वगळणे

पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे पहिल्या तीन क्रमांकांत असतानाही केवळ पुण्याचा समावेश करून पिंपरी-चिंचवड शहर वगळणे हा दोन्ही शहरांतील नागरिकांचा अपमान असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पुण्यात केली. महापालिकेच्या वतीने आयोजित शनिवार वाडा सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे, नगरसेविका शारदा ओरसे, लक्ष्मी घोडके, सुनंदा गडाळे या वेळी उपस्थित होत्या. मुंडे म्हणाले, ‘‘पुण्याची ओळख देशाला नव्हे, तर जगाला आहे. वेगाने विकसित होणारी शहरे पुणे आणि पिंपरी आहेत. पिंपरी-चिंचवड तर देशाची औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही राज्य शासनाने ही दोन्ही शहरे एकत्रितपणे स्मार्ट सिटीसाठी पाठविली. विशेष म्हणजे, ही दोन्ही शहरे पहिल्या तिनांमध्ये असतानाही केंद्राकडून पिंपरी-चिंचवडला डावलले गेले ही अन्यायकारक बाब आहे.’’ शनिवार वाडा महोत्सवाने पुण्याची संस्कृती जपण्याचे काम केले असल्याचे सांगून या पुढे जाऊन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पुणेकरांनी मदत करून नवा आदर्श घालून द्यावा, अशी मागणी या वेळी मुंडे यांनी उपस्थितांना केली. महोत्सवाचे उद्घाटन गणेशवंदना आणि ढोलताशा पथकाच्या वादनाने करण्यात आली. महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त जल्लोष सिनेतारकांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.