गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना पर्वती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:20 IST2025-08-29T18:20:02+5:302025-08-29T18:20:44+5:30

आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा एकूण ₹१,९९,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

Parvati police handcuffed two people who snatched mangalsutra from the street | गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना पर्वती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोघांना पर्वती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पायी चालणाऱ्या महिलेला गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पर्वती पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व एक मोटार सायकल असा एकूण ₹१,९९,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही घटना दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मानसी अपार्टमेंट, तुळशीबागवाले कॉलनीत घडली होती. फिर्यादी महिला पायी चालत असताना अज्ञात दोन इसमांनी मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. या प्रकारानंतर फिर्यादींनी तत्काळ पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी कलम ३९२(३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवार व तपास पथकाने तांत्रिक तपासासह गुप्त माहितीच्या आधारे केला. तपासादरम्यान गुन्ह्यातील संशयित १) रोहन प्रभु तुपारे (वय २०, रा. सद्धे ४८१/९, झिम्मुटी नगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे) आणि २) केशव ईश्वर कुमार (वय १८, रा. खोपडे नगर, चककी कारखाना, महात्मा फुले नगर, महाडेववाडी, पुणे) यांना शिताफीने अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ₹१,९९,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Web Title: Parvati police handcuffed two people who snatched mangalsutra from the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.