शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पार्थ पवार 'काकां'ची भेट घेण्यासाठी पोहचले 'बारामतीत'; माध्यमांशी बोलण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 21:48 IST

शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पार्थ पवार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.

ठळक मुद्दे'पार्थ' यांच्यासाठी सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते भिडले 

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणाची केलेली सीबीआय चौकशीची मागणी व जय श्री राम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला दिलेल्या शुभेच्छा यामुळे पार्थ पवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली होती. त्यानंतर पार्थ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विसंगत भूमिकेवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना 'पार्थ अपरिपक्व असून नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही'' असे सांगत त्यांना चांगलेच फटकारले होते. शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पार्थ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची देखील कुणकुण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार शनिवारी  (दि. १५ ) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे काका श्रीनिवास पवार यांची कण्हेरी (ता.बारामती ) येथील ''अनंतारा''  या निवासस्थानी घेतलेली भेट निश्चितच महत्वपूर्ण आहे.          पवार कुटुंबातील उद्भवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यावर येणार असल्याची माहिती पुढे आली होती  मात्र, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्या पार्थ यांनी एकट्यानेच शनिवारी कण्हेरी हे काकांचे निवासस्थान गाठले. तर त्यांच्याआधी शुक्रवारी (दि.१४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार भेटून गेले आहेत. परंतु, या सर्व घडामोडींवर बोलताना त्यांच्या शर्मिला पवार यांनी पार्थ हे नेहमीप्रमाणे जेवायला येणार असल्याचे पत्रकारांना सांगितले .     

      दरम्यान, पार्थ शनिवारी दुपारी एकटेच बारामती येथील श्रीनिवास पवार यांच्या निवास्थानी पोहचले. त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. अजित पवार यांच्या राजकीय जीवनात त्यांचे काका शरद पवार यांची भुमिका महत्वाची मानली जाते .त्याचप्रमाणे पार्थ यांचे काका श्रीनिवास पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे .विधानसभा निवडणूक काळात अजित पवार ' नॉट रिचेबल ' होते .त्यावेळी देखील त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ते होते .त्यामुळे आज पार्थ यांनी त्यांच्या काकांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.----------------------------...' पार्थ ' यांच्यासाठी सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते भिडले   राष्ट्रवादीच्या बालेकिल्लयात कार्यकर्त्यांनी पवार कुटुंब एकसंध असल्याचे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले आहे .सोशल मीडियावर त्यासाठी हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पार्थ पवार यांच्यासाठी  सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत .पार्थ यांच्याबाबत कधी नव्हे एवढ्या प्रथम भाजप कार्यकर्ते  येथे सोशल मिडियावर सक्रिय झालेले दिसून येतात .त्यासाठी लोकसभा निवडणूकीचे पार्थ यांचे संदर्भ वापरले जात आहेत .

टॅग्स :Baramatiबारामतीparth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण