शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिव पेठेत इमारतीचा काही भाग काेसळला; १० रहिवाशांची सुटका, सुदैवाने कोणीही जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:30 IST

सदाशिव पेठेतील चारुदत्त अपार्टमेंट या तीन मजली इमारतीतील सीमा भिंत, गॅलरी, जिन्याचा काही भाग मध्यरात्री कोसळला

पुणे : सदाशिव पेठेतील जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून दहा रहिवासी अडकल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नानंतर दहा रहिवाशांची सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

सदाशिव पेठेतील चारुदत्त अपार्टमेंट या तीन मजली इमारतीतील सीमा भिंत, गॅलरी, जिन्याचा काही भाग मध्यरात्री कोसळला. या इमारतीत पाच महिलांसह दहा रहिवासी अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर भवानी पेठेतील मुख्य अग्निशन केंद्रातून रेस्क्यू व्हॅन, जनता वसाहत अग्निशमन केंद्रातील बंब, तसेच जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलीस, महापालिकेच्या घरपडी विभागाचे अभियंता घटनास्थळी पाेहोचले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर आणि जवानांनी मदतकार्य सुरू केले.

शिडी, सुरक्षा पट्टा (सेफ्टी बेल्ट), दोरीचा वापर करुन जवानांनी सीताबाई बागल (वय ७०), शुभम बागल (वय २३), वनमाला बागल (वय ४५), सुनंदा निरगुणे (वय ५२), संकेत बागल (वय २३), सुरेश बागल (वय ६०), स्वप्नील बागल (वय २४), चारुशीला कुलकर्णी (वय ५२), रुपाली माने (वय ४९), कमलाकर माने (वय ५५) यांनी सुटका केली, तसेच जेनी नावाच्या श्वानाची सुटका करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Building Collapse in Sadashiv Peth, Pune: Residents Rescued, No Injuries

Web Summary : Part of an old building collapsed in Sadashiv Peth, Pune, trapping ten residents. Firefighters rescued everyone, including a dog, without any injuries. The incident involved a three-story structure.
टॅग्स :Puneपुणेsadashiv pethसदाशिव पेठfireआगFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनSocialसामाजिकAccidentअपघात