शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पनीर रोलऐवजी दिला चक्क चिकन रोल!

By admin | Updated: September 25, 2015 01:39 IST

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये असलेल्या चिकागो क्रस्ट या खाद्यपदार्थांच्या आऊटलेटमध्ये

पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतमध्ये असलेल्या चिकागो क्रस्ट या खाद्यपदार्थांच्या आऊटलेटमध्ये शाकाहारी प्रवाशांना पनीर रोल म्हणून चक्क चिकन रोल खायला दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. ही बाब लक्षात येताच संबंधित प्रवाशाने याबाबत चालकाकडे विचारणा केली. याठिकाणी असलेले इतर पनीर रोल उघडून पाहिले असता, त्यातही चक्क चिकन असल्याचे आढळून आले. मात्र, या प्रकारानंतर संबंधित कंपनीने माफी मागत सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. शहा हे चीनला जाण्यासाठी पुण्याहून जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू ३७९ रात्री आठ वाजताच्या विमानाने दिल्लीला जाणार होते. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोहोचले. आठ वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या परिसरात असलेल्या चिकागो क्रस्ट या खाद्य पदार्थाच्या आऊटलेटमध्ये त्यांनी पनीर रोलची आॅर्डर दिली. हा रोल खाल्ल्यावर त्याची चव वेगळीच असल्याचे शहा यांच्या लक्षात आले. त्यांनी रेस्टॉरंट चालकाकडे याबाबत तक्रार केली. परंतु, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सर्व पनीर रोल दाखविण्याची मागणी केल्यावर या सर्वच रोलमध्ये चक्क चिकन आढळून आले. त्यामुळे शहा यांना प्रचंड धक्का बसला. त्यांनी तातडीने आपल्या नातेवाइकांना फोन वरून हा प्रकार कळविला. त्यांनी संबंधित आऊटलेटच्या व्यवस्थापकांना जाब विचारला. त्यानंतर नातेवाइकांकडून संबंधित हॉटेल व्यवस्थापकाकडून याबाबत माफी मागण्यात आली. रोलवर लावण्यात आलेला व्हेज आणि नॉनव्हेजचे चिन्ह नजरचुकीने बदलल्याने हा प्रकार घडल्याचे संबंधित चालक सांगत असल्याचे शहा यांच्या नातेवाइकांनी सांगितले. याबाबत डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हीएशन (डीजीसीए) कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.