शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

दौंडकरांची पिण्याच्या पाण्याची ‘बोंब’!

By admin | Updated: May 25, 2014 05:00 IST

शहरातील नवगिरेवस्ती येथे बर्‍याच भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. सिद्धार्थनगरला रात्री ८ वाजता, तर भीमनगरला रात्री १ वाजता पाणीपुरवठा होतो

दौंड : शहरातील नवगिरेवस्ती येथे बर्‍याच भागांमध्ये पाणीपुरवठा होत नाही. सिद्धार्थनगरला रात्री ८ वाजता, तर भीमनगरला रात्री १ वाजता पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त असून, रात्री-अपरात्री महिलांसह कुटुंबीयांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. दौंड शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात कमी दाबाने, तर काही भागात पाणीपुरवठाच होत नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नगरसेवक राजू बारवकर यांनी मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्याकडे केली आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी साठेल असा तलाव नगरपालिकेचा आहे. तरीदेखील गेल्या वर्षी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी नगरपालिकेला लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला होता. गेल्या दोन वर्षांत शहरात जलवाहिन्या टाकणे, जलवाहिन्या दुरुस्त करणे, फिल्टर टँकचे नूतनीकरण करणे या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, तरीदेखील शहरातील काही भागात पाण्याची समस्या कायम आहे. नगर परिषदेचा कारभार एकाधिकारशाही पद्धतीने केला जात आहे. कुणालाही विश्वासात घेतले जात नाही, असे बारवकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)