शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला चार महिन्यांपासून सापडेना गळती

By admin | Updated: February 2, 2015 02:23 IST

भोर शहरातील पोलीस स्टेशन ते रामबाग रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यामधून गेलेल्या पाणीपुरवठा

भोर : भोर शहरातील पोलीस स्टेशन ते रामबाग रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यामधून गेलेल्या पाणीपुरवठा लाईनची गळती मागील चार महिन्यांपासून भोर नगरपालिकेला सापडत नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. यातून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ताही खोदण्यात आल्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागतात. भोर शहरातील चौपाटी ते रामबाग या महाड-पंढरपूर रस्त्यामधून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे. मात्र या पाईपलाईनला गळती लागली आहे. गेल्या ४ महिन्यांपासून पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही गळती सापडत नाही. गळती शोधण्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र काही ठिकाणचेच खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले. मात्र चौपाटी परिसरातील पाणीपुरवठा लाईन भर रस्त्यातूनच गेल्याने मागील अनेक महिन्यांपासून ती गळत आहे. त्यामुळे सुरू झालेले काम पुन्हा बंद करण्यात आले. गळती शोधण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दररोज रस्ता उकरून नवनवीन खड्डे पडत आहेत. मात्र त्यांना पाण्याची गळती काही सापडेना. रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यात पाणी साचते. या खड्ड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे हा रस्ता येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (वार्ताहर)