शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या

By किरण शिंदे | Updated: May 25, 2025 15:27 IST

रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले.

पुणे - पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या प्रगती जगदाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली असून, भाजप खासदार रामचंद्र जांगरा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

या हल्ल्यानंतर भाजपचे खासदार रामचंद्र जांगरा यांनी दिलेल्या विधानाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जांगरा यांनी आपल्या विधानात म्हटले होते की, “हल्ल्यावेळी पर्यटक महिलांनी हात जोडून भीक मागण्यापेक्षा लढा दिला असता, योग्य ठरले असते.” या वक्तव्यावर प्रगती जगदाळे यांनी प्रत्युत्तर दिले.

त्या म्हणाल्या, “रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले. त्यांनी आम्हाला धर्म विचारला आणि आमच्या पतींवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या हातात रायफल्स होत्या. अशा शस्त्रांसमोर कोणतीही स्त्री किंवा पुरुष वीरगतीने लढू शकत नाही. आम्ही त्या क्षणी भीती आणि धक्क्यात होतो.”

तसेच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही विनंती केली आहे. “पंतप्रधान मोदींनी आमचे दुःख ओळखले, ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्यांनी बदला घेतला, ज्यामुळे आम्हाला थोडं समाधान मिळालं. पण, आता त्यांच्या पक्षातील खासदारानेच अशा प्रकारची वक्तव्ये करून आमच्या जखमांवर मीठ चोळले आहे.”

प्रगती जगदाळे यांनी पंतप्रधान मोदींना थेट मागणी केली आहे की, “रामचंद्र जांगरा यांच्या विरोधात कठोर कारवाई करा. आम्ही वीर पत्नी आहोत की नाही, हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमच्या वेदना आणि स्थिती समजून घेण्यासाठी जांगरा यांनी आमच्या घरी येऊन आमची अवस्था प्रत्यक्ष पाहावी.”

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला