शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आपली लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, नक्कीच जिंकणार, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 16:47 IST

आजही अनेक नेते पवार यांच्यासोबतच असून संख्या महत्वाची नाही, गुणवत्ता महत्वाची आहे

पुणे: आपली लढाई ‘तुकाराम विरूद्ध नथुराम’ अशी आहे. आपण तुकाराम आहोत, त्यामुळे आपण नक्की जिंकणार आहोत, अशा जोरदार शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्धापनदिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली. त्यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, निलेश लंके व अन्य नेत्यांनीही जोरदार टोलेबाजी करत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्याना आगामी निवडणुकांसाठी तयार केले.

पाटील म्हणाले, पक्षस्थापनेला २६ वर्षे झाली. या २६ वर्षांमध्ये फक्त राज्यातच नाही तर देशातही पक्षाचे मोठे योगदान आहे. शरद पवार यांच्यासारखा वटवृक्ष आपल्यासोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षाने राज्यात, देशात मोठा दुरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. आजही अनेक नेते पवार यांच्यासोबतच आहेत. संख्या महत्वाची नाही, गुणवत्ता महत्वाची आहे. ही लढाई तुकाराम विरूद्ध नथूराम अशी आहे. आपण तुकाराम आहोत, त्यामुळे विजय आपलाच आहे. खासदार सुळे यांनी फक्त वडिल म्हणून नाही तर एक राजकीय नेता म्हणूनही शरद पवार यांची निर्णयक्षमता, पुढचे पाहण्याची दृष्टी याचे आकर्षण असल्याचे सांगितले. पक्ष कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाडी, वस्ती, गाव, तालुका या स्तरावर असे वर्ग व्हावेत. वैशाली हगवणेसारखे हुंडाबळी होतात हे आश्चर्यकारक आहे. का नाही आपण हुंडाबंदी चळवळ सुरू करत? पुढील महिन्यापासून आपण राज्याचा दौरा सुरू करणार आहोत असे सुळे यांनी सांगितले.

जयंत पाटील यांचा राजीनामा आलाच नाही 

कार्यक्रमानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटील यांचा राजीनामा वगैरे काहीच नसल्याचा दावा केला. त्यांनी तसे पत्रही दिले नाही किंवा त्यांनी तसे सांगितलेलेही नाही असे त्या म्हणाल्या. त्यांनी त्यांचा वैयक्तिक विचार मांडला आहे. राजीनामा दिलेलाच नाही तर नव्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीचा प्रश्न येतो कुठे, असा प्रतिप्रश्न खासदार सुळे यांनी केला. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, माजी आमदार जयदेव गायकवाड, भूषणसिंह होळकर, मार्झिया पठाण यांची भाषणे झाली.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस