शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

मेकँझी कंपनीला विरोध

By admin | Updated: August 29, 2015 03:42 IST

स्मार्ट सिटीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मेकँझी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी विरोध केला आहे.

पुणे : स्मार्ट सिटीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मेकँझी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावातून खासगी कंपनीचा फायदा करण्याचा हा डाव असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.स्मार्ट सिटीसाठी पुणे शहराची निवड झाली आहे. येत्या तीन महिन्यांत केंद्र सरकारकडे त्यासाठी सविस्तर प्रस्ताव पाठवायचा आहे. कोणती कामे करायची, त्यात प्राधान्य कशाला द्यायचे वगैरे कामासाठी सल्लागार म्हणून मेकँझी कंपनीची निवड करण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. समितीमध्ये हा विषय घेणे बेकायदेशीर आहे, संबधित कंपनी इतकी चांगली असेल तर ती खुल्या स्पर्धेत का उतरत नाही असा प्रश्न केसकर यांनी उपस्थित केला आहे.मेकँझीचे प्रमुख, पुण्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राज्य सरकारमधील एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त दबावातून या कंपनीला हे काम देण्याचा घाट घातला जात असल्याची शंका केसकर यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही एकदा मेकँझीला सल्लागार म्हणून महापालिकेत आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी लोकायुक्तांकडे तक्रार केली गेली. त्याबाबत लोकायुक्तांनी नोंदवलेली निरीक्षणे व महापालिका कायदा यांचा विचार करून या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा विषय मागे घ्यावा अशी मागणी केसकर यांनी केली आहे. त्याचबरोबर महापालिकेचा विकास आराखडा तयार करणारे अनुभवी अधिकारी, या क्षेत्रातील जाणकार पुणेकर यांचा सल्ला घ्यावा, असेही केसकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)