तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या व्यापाऱ्याला धमक्यांचे फोनवर फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:56 IST2025-05-15T10:55:23+5:302025-05-15T10:56:07+5:30
तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे.

तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या व्यापाऱ्याला धमक्यांचे फोनवर फोन
- किरण शिंदे
पुणे - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानवर हल्ला केला, तेव्हा तुर्कीने पाकिस्तानला लष्करी विमाने भरून भरून ड्रोन, शस्त्रास्त्रे पाठविली होती. जेव्हा तुर्कीत भूकंप झालेला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत पाठविली होती, हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला मदत करत भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे आता भारतीय जनतेत संतापाची लाट आहे. तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात 'बॉयकॉट तुर्की' अभियान सुरु झाले आहे. तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे.
अशात पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद आणणे बंद केले आहे. यामुळे स्थानिक बाजारातून सफरचंद गायब झाले आहेत. ग्राहकांना अद्याप हे सफरचंद काश्मीरमधून येतातय की तुर्कीतून याची माहिती नव्हती, परंतू आता होऊ लागली आहे. पुण्यात जवळपास १००० ते १२०० कोटींची उलाढाल होते, ती थांबविण्यात आली.
अधिकच्या माहितीनुसार, पुण्यातील फळांचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कस्तानच्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. इथून पुढे तुर्कस्तान मधून कुठलेही फळ मागवणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आता व्यापारी सुयोग झेंडे यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. सुयोग झेंडे यांना अज्ञात नंबर वरून फोन आले आणि ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.
तुर्की सफरचंदांची मागणी झाली कमी
या बहिष्काराबद्दल पुणे एपीएमसी सफरचंद व्यापारी सुयोग झेंडे म्हणाले की होते की, ;गेल्या काही दिवसांत तुर्की सफरचंदांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. सामान्य नागरिकही बहिष्कार तुर्की मोहिमेत सामील झाले आहेत आणि तुर्की सफरचंदांऐवजी इतर ठिकाणांहून सफरचंद खरेदी करत आहेत.'