शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

....तरच जगात मराठी पोहोचेल

By admin | Updated: August 18, 2015 03:53 IST

ज्ञानपीठसारख्या मोठ्या पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यिक मागे पडण्याचे कारण म्हणजे मराठी साहित्यिकांना इंग्रजी भाषेची अडचण होते. साहित्यिकांना इंग्रजी

पुणे : ज्ञानपीठसारख्या मोठ्या पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यिक मागे पडण्याचे कारण म्हणजे मराठी साहित्यिकांना इंग्रजी भाषेची अडचण होते. साहित्यिकांना इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे जरुरीचे आहे. जेणेकरून मराठी साहित्य संपूर्ण जगभर प्रसिद्ध होईल, असे परखड मत विश्व मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांना डॉ. शेषराव मोरे यांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आला. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी मोरे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह डॉ. कल्याणी दिवेकर, प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.मोरे म्हणाले, ‘‘पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालू नये. १०वीपर्यंत इंग्रजी भाषेची गरज नाही. कारण मूलभूत गोष्टी समजण्यासाठी मातृभाषेचीच गरज असते. त्याशिवाय आपल्याला साहित्याची ओळख होणार नाही. मात्र, ११वीनंतर इंग्रजी भाषेचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. जगभरातील साहित्याचा अभ्यास करण्यासाठी व मराठी साहित्याला देशभर पोचविण्यासाठी इंग्रजी भाषेची गरज आहे.’’ (प्रतिनिधी)