शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणानंतरच जागा समजेल

By admin | Updated: September 28, 2016 04:35 IST

राजेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन विमानतळास जमिनी, घरे देणार नसल्याचे ग्रामसभेच्या ठरावाची प्रत देऊन विरोध केला. परंतु पुरंदर तालुक्यातील

राजेवाडी : राजेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन विमानतळास जमिनी, घरे देणार नसल्याचे ग्रामसभेच्या ठरावाची प्रत देऊन विरोध केला. परंतु पुरंदर तालुक्यातील विमानतळास दोन जागांपैकी कोणती जागा जाणार, याबाबत प्रत्यक्ष जमीन सर्वेक्षण केल्याशिवाय सांगता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी राजेवाडी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळास सांगितले. माजी आमदार संभाजीराव कुंजीर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर व पारगाव मेमाणे, खानवडी, मुंजवडी परिसरात होणाऱ्या जागेला पसंती दिली असल्याने पुरंदर तालुक्यातच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिक्कामोर्तब केले असले तरी जागा कोणती, याविषयी संभ्रम आहे.राजेवाडी-वाघापूर परिसराची पाहणी केल्यापासून येथील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी विमानतळात जाणार आहेत, त्यांची झोप उडाली आहे. शेतकरी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार तातडीची विशेष ग्रामसभा घेण्यात आली व गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची महिलांनी संतप्त होऊन विमानतळास विरोध करण्यात आला. या ग्रामसभेचा ठराव घेऊन हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले.या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी, आम्ही कोणाच्याही जमिनी जबरदस्तीने घेणार नसून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याशी गावात जाऊन भूसंपादन कसे होणार, याविषयी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच विमानतळाचे काम होणार असल्याचे स्पष्ट केले.या वेळी सरपंच पुष्पांजली बधे, उपसरपंच गौतम जगताप, उद्योगपती विठ्ठल जगताप, विलास कडलग, हनुमंत थोरात, अक्षय जगताप, सागर कटके, दिगंबर कडलग, तेजस ताकवले, दत्तात्रय जगताप, अमोल नागवडे, संदीप जगताप, रतनबाई जगताप, संगीता जगताप यांच्यासह राजेवाडी वाघापूर आंबळे येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)साहेब, आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत साहेब आमच्या जमिनी घेऊ नका. आम्ही कोठे जाणार. आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत साहेब. आमच्या झोपा उडाल्या आहेत, असे म्हणून शेतकरी महिला रतनबाई जगताप यांना अश्रू अनावर झाले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रडू नका. आम्ही बळजबरी करून जमिनी घेणार नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करूनच कार्यवाही करावी.