भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवा चार दिवस बंद, नागरिकांची गैरसोय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 20:15 IST2026-04-01T20:15:41+5:302026-04-01T20:15:51+5:30

ज्या नागरिकांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज किंवा इतर कामांसाठी तातडीने डिजिटल स्वाक्षरीचे उतारे हवे आहेत, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे

Online services of Land Records Department to be closed for four days, citizens will be inconvenienced | भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवा चार दिवस बंद, नागरिकांची गैरसोय होणार

भूमी अभिलेख विभागाच्या ऑनलाईन सेवा चार दिवस बंद, नागरिकांची गैरसोय होणार

पुणे : संगणकीय प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा गुरुवारपासून (दि.२) रविवारपर्यंत (दि. ५) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिली.

या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची ‘क’ प्रत मिळवणे, फेरफार नोंदी , नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या प्रमुख सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे भूमि अभिलेख विभागाने म्हटले आहे. सध्याच्या काळात नागरिक डिजिटल सातबारे उतारे घेत आहेत. सलग चार दिवस या ऑनलाईन सेवा बंद राहणार असल्याने याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नागरिकांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज किंवा इतर कामांसाठी तातडीने डिजिटल स्वाक्षरीचे उतारे हवे आहेत, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यांना आता चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Web Title : भूमि अभिलेख विभाग की ऑनलाइन सेवाएं चार दिन बंद, नागरिकों को असुविधा

Web Summary : भूमि अभिलेख विभाग की ऑनलाइन सेवाएं रखरखाव के कारण गुरुवार से रविवार तक बंद रहेंगी। इससे डिजिटल भूमि रिकॉर्ड, संपत्ति कार्ड और अन्य आवश्यक सेवाओं तक पहुंच बाधित होगी, जिससे लेनदेन या ऋण के लिए तत्काल दस्तावेजों की आवश्यकता वाले नागरिकों को असुविधा होगी।

Web Title : Land Records Department Online Services Down for Four Days, Causing Inconvenience

Web Summary : Land Records Department online services will be unavailable from Thursday to Sunday due to maintenance. This outage will disrupt access to digital land records, property cards, and other essential services, causing inconvenience for citizens needing urgent documents for transactions or loans.