शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

करिअर निवडीसाठीच आॅनलाईन निकाल

By admin | Updated: June 2, 2014 00:30 IST

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या वाटा निवडण्याची संधी उपलब्ध होते.

पुणे: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या वाटा निवडण्याची संधी उपलब्ध होते. परंतु, आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकेची मूळ प्रत मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आॅनलाईन निकाल प्रसिद्ध झाल्यावर सुमारे आठ दिवसांनी गुणपत्रिकेच्या मूळ प्रती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. निकालाची मूळ प्रत मिळेपर्यंतच्या आठ दिवसांचा पुरेपूर उपयोग पालक व विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी करून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या समुपदेशकांकडून केले जात आहे. आपल्या पाल्याला बारावीमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले, तर पालकांना फारशी काळजी नसते. परंतु, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना आपल्या करिअरबाबत काळजी वाटते. चांगले गुण मिळाले, तरीही कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. तर, कमी गुण मिळाल्यावर आता कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन द्यावा, याची चिंता पालकांना सतावत असते. त्यात आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका हातात मिळेपर्यंत काय करावे, हेसुद्धा अनेकांना सुचत नाही. त्यामुळेच राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक जिल्ह्यासाठी समुपदेशकाची व हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. करिअर व मिळालेल्या गुणाबाबत शंकांबाबत विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. शिक्षण मंडळाचे समुपदेशक टी. एम. बांगर म्हणाले, केवळ अभियांत्रिकी आणि मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला, तरच विद्यार्थ्यांना करिअर करता येते, असे होत नाही. तर, या व्यतिरिक्त इतरही क्षेत्रांत करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. करिअरच्या विविध संधींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना पुरेसा अवधी उपलब्ध आहे. कला, वाणिज्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनाही करिअरच्या वेगवेगळ्या संधी अलीकडच्या काळात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पारंपरिक शिक्षण न घेता इतर पर्यायांचा विचार करायचा आहे, त्यांनी नव्याने निर्माण झालेल्या संधी निवडाव्यात.