शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Pune-Nashik Railway Route: पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात शंभर कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 5:31 PM

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून शंभर कोटींचा पहिला टप्पा संबंधित जिल्हाधिका-यांकडे वर्ग केला आहे

पुणे : पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेली जमीन मोजणी पूर्ण होत आली असून, जागेचा मोबदला निश्चित करून हवेली तालुक्यातून पैसे वाटप सुरू झाले आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून शंभर कोटींचा पहिला टप्पा संबंधित जिल्हाधिका-यांकडे वर्ग केला आहे. यामुळेच आता जमीन खरेदी प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग हा अनेक वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय होता. परंतु गतवर्षी या रेल्वे मार्गाला परवानगी मिळून सध्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमधील जमिन मोजणी पूर्ण झाली आहे. आता जमिनीचे दर निश्चित करून जमिन खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठीचे पहिले खरेदी खत हवेली तालुक्यातील पेरणे गावापासून सुरू झाले आहे. आता शासनाने यासाठी शंभट कोटींचा पहिला टप्पा रिलीज केला आहे. यामुळेच जमिन खरेदी प्रक्रिया आता गतीने सुरू होण्यास मदत होणार आहे. पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग २३५ किलोमीटरचा असून, या अंतर्गत दोन मार्ग बनविण्यात येणार आहेत. तर ही रेल्वे  २०० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावेल. पुण्यासह अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांतून ही रेल्वे जाईल.  रेल्वेमार्गावर १८ बोगदे आणि ४१ उड्डाणपूल केले जाणार आहेत. या संपूर्ण कामासाठी तब्बल १५०० कोटीचा निधी लागणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक-पुण्याचा खडतर आणि वेळखावू प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे. आता शासनाने जलद गतीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. 

रेल्वेने त्वरीत अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा 

''पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील 54 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. सर्व गावांमधील जमिन मोजणी पूर्ण होत आली असून,  जमिनीचे दर निश्चित देखील अंतिम टप्प्यात आली आहे. हवेली तालुक्यात पैसे वाटप देखील सुरू झाले असून,  रेल्वे विभागाने आता अधिकचा व आवश्यक सर्व निधी तातडीने उपलब्ध करून दिल्यास जमिन खरेदीची प्रक्रिया देखील विक्रमी वेळेत पूर्ण करणे शक्य होईल असे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले.'' 

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे 

पुणे जिल्ह्यातील एकूण गावे : 54 - हवेली तालुक्यातील गावे : 12- खेड तालुक्यातील गावे : 21- आंबेगाव तालुक्यातील गावे : 10- जुन्नर तालुक्यातील गावे : 08

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिकrailwayरेल्वेhighwayमहामार्गCentral Governmentकेंद्र सरकार