शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले

By admin | Updated: October 13, 2015 00:44 IST

पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही, असा पवित्रा घेत पिंपरी सांडस पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय

पिंपरी सांडस : पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही, असा पवित्रा घेत पिंपरी सांडस पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय कृती समितीने आज मोजणी करण्यासाठी आलेल्या पुणे महापालिका व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध केला. सुमारे दीड हजार ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या संतप्त भूमिका पाहून अधिकाऱ्यांनी परत जाणे पसंत केले.येथील गट. क्र . ४९३ मधील वन विभागाच्या जागेत हा कचरा प्रकल्प प्र्रस्तावित आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी आंदोलने, मोर्चे काढून आपला विरोध दर्शवला आहे. आज (१२ आॅक्टोबर) कचरा डेपोसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोजणी करण्याचे ठरवले होते. तशा प्रकारचे पत्र त्यांनी लोणी कंद पोलीस स्टेशनला देऊन संरक्षणामधे मोजणी करणार होते. अधिकारी येणार असल्याची कुणकूण लागताच पंचक्रोशीतील सुमारे दीड हजार ग्रामस्थ येथे ठिय्या मांडून होते. अधिकारी आल्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.आम्ही या कचरा डेपोला विरोध म्हणून आतापर्यंत अनेक निवेदने, आंदोलने, मोर्चे काढले; मात्र तरीही ही प्रक्रिया पुढे सरकत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मध्यस्थी करीत जमावाला शांत केले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मोजणी रद्द केली. या वेळी ग्रामस्थ संतप्त होते. पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही केली असती तर जमावाच्या तीव्र भावनांना सामोरे जावे लागले असते. या वेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, कृती समिती अध्यक्ष विकास लवांडे, शिवसेना तालुकाप्रमुख दौलत पायगुडे, शांताराम कटके, शिवदास उबाळे, कुशाभाऊ गावडे, चंद्रकांत सातव, संजय पायगुडे, विजय पायगुडे, संजय भोरडे, महेश शिंदे, वाल्मीकराव भोरडे, श्रीहरी कोतवाल, सीताराम बाजारे, सुभाष कोतवाल, सतीश भोरडे, राजुअण्णा भोरडे, रवींद्र कंद, रामदास ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, शंकर मांडे, बाळासो भोरडे, प्रकाश भोरडे, सुवर्णा गजरे, अंकुश कोतवाल, विकास कोतवाल, शंकर भोरडे, संपत भोरडे, दत्तात्रय सातव, प्रकाश जमादार, राजेश वारघडे, पांडुरंग हरगुडे, गणेश कुटे यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)आता आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. सरकारने बळाचा वापर केला तर प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ; पण पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी व पालकमंत्री राहतील.- विकास लवांडे, अध्यक्ष (कृती समिती )