शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या घरी चाकरी

By admin | Updated: August 4, 2015 03:33 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) वेतन घेणारे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी चाकरी करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे

राजानंद मोरे, पुणेपुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) वेतन घेणारे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी चाकरी करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करण्यापासून घराच्या साफसफाईपर्यंतची कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांना नातेवाइकांकडे कामात मदत करण्यासाठीही पाठवले जात आहे. मागील काही वर्षांपासून राजरोसपणे हा प्रकार सुरू आहे. हे काम करण्यास नकार दिल्यास त्यांंची अन्यत्र बदली करणे किंवा नोकरीतून काढून टाकण्याचा इशारा दिला जात आहे.पीएमपीमध्ये स्वच्छता विभागांतर्गत विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कर्मचाऱ्यांची अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून पीएमपीतील काही अधिकाऱ्यांच्या घरी या कर्मचाऱ्यांना तेथील कामे करण्यासाठी पाठविले जात आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सध्या या अधिकाऱ्यांच्या घरी काम करीत असलेल्या व यापूर्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी संवाद साधत या अप्रिय कामावर प्रकाशझोत टाकला. पीएमपीचे एक तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या घरी काम केलेल्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले, की या अधिकाऱ्याच्या घरी सहा महिने स्वयंपाक व भांडी घासण्याचे काम केले. घराची साफसफाई व कपडे धुण्यासाठी त्यांनी एक महिला कामावर ठेवली होती. त्या वेळी केवळ दोन महिन्यांसाठीच काम करावे लागेल, असे सांगितले होते. त्यामुळे मी काम करण्यास तयार झाले. काम करण्याची जबरदस्ती करण्यात आली होती. दोन महिने काम केल्यानंतर आणखी पुढे काम करण्याचे सांगण्यात आले. सहा महिन्यांनंतर मात्र मी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे माझी घरापासून लांब असलेल्या पीएमपीच्या आगारात बदली करण्यात आली. कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घरीही कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. एका अधिकाऱ्याच्या घरी काम केलेला कर्मचारी म्हणाला, की अधिकाऱ्यांच्या खासगी गाडीवर चालक म्हणून काम करायचो. त्यांच्या नातेवाईक मित्रांसाठीही हे काम करावे लागायचे. सध्या या अधिकाऱ्याच्या घरी तीन कर्मचारी आलटून-पालटून काम करतात. त्यांना भांडी घासणे, घराची साफसफाई करणे, सामानाची ने-आण करण्याची कामे करावी लागत आहेत. सध्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी काम करीत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने लोकमतशी बोलताना आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, अधिकाऱ्याच्या घराची स्वच्छता करण्याचे काम सध्या करावे लागत आहे. पीएमपीतील वेळेपेक्षा अधिक काम करून घेण्यात आले. अधिकाऱ्यांच्या घरी आम्हाला काम करायचे नाही. पीएमपीत कुठेही काम दिले तरी आम्ही ते करण्यास तयार आहोत. हे काम करण्यास नकार दिलेल्या एका महिलेची लगेच बदली करण्यात आली.