केस कापण्यासाठी आलेल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 05:26 PM2021-11-25T17:26:18+5:302021-11-25T17:26:27+5:30

केश कर्तनालयातील कारागिराला अटक करण्यात आली आहे

An obscene act with an eight-year-old girl who came to get a haircut | केस कापण्यासाठी आलेल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य

केस कापण्यासाठी आलेल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील कृत्य

Next

पिंपरी : पिंपरी चिखली परिसरात एका केश कर्तनालयातील कारागिराने त्याच्याकडे केस कापण्यासाठी आलेल्या आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी कारागिराला अटक केली आहे. 

चिखली पोलीस ठाण्यात आठ वर्षीय मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार मोहम्मद शेबू मोहम्मद हानिफ सलमानी (रा. चिखली) याला अटक केली आहे. पीडित मुलगी आणि तिची आजी केस कापण्यासाठी केश कर्तनालयात गेल्या होत्या. मुलीचे केस कपात असताना केश कर्तनालयातील कारागिराने पीडित मुलीसोबत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी केश कर्तनालयातील कारागिराला अटक करण्यात आली आहे.

Web Title: An obscene act with an eight-year-old girl who came to get a haircut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app