Pune Corona News : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा ३ हजारांच्या पुढे; गुरूवारी शहरात ३३३ कोरोनाबाधितांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 07:46 PM2021-07-22T19:46:46+5:302021-07-22T19:51:25+5:30

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७९१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.२७ टक्के इतकी आढळून आली आहे.

The number of active patients again exceeds 3,000; An increase of 333 corona victims in the city on Thursday | Pune Corona News : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा ३ हजारांच्या पुढे; गुरूवारी शहरात ३३३ कोरोनाबाधितांची वाढ

Pune Corona News : सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा ३ हजारांच्या पुढे; गुरूवारी शहरात ३३३ कोरोनाबाधितांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे केवळ १८७ जण बरे होऊन घरीदिवसभरात १० जणांचा मृत्यू आतापर्यंत ४ लाख ७३ हजार ३१३ जण कोरोनामुक्त

पुणे : शहरात गुरूवारी ३३३ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ७९१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.२७ टक्के इतकी आढळून आली आहे.

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या आज पुन्हा ३ हजाराच्या पुढे गेली असून, आजमितीला शहरात ३ हजार ७ इतकी आहे. आज दिवसभरात १०जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़  शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३७२ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २८ लाख १६ हजार ६७५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८५ हजार ३५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७३ हजार ३१३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The number of active patients again exceeds 3,000; An increase of 333 corona victims in the city on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.