शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मतदार स्लिपबरोबर घरात पडल्या नोटा

By admin | Updated: February 21, 2017 02:56 IST

एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट, झोपडपट्टीतील कट्ट्याकट्ट्यावर मात्र लोकांचे घोळके

पिंपरी : एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट, झोपडपट्टीतील कट्ट्याकट्ट्यावर मात्र लोकांचे घोळके... परिसरात घिरट्या मारणाऱ्या काळ्या काचेच्या मोटारी असे चित्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक निमित्ताने शहरात पहावयास मिळाले. कोठे मतदार याद्या बरोबर घेऊन मतदारांना पैसे वाटप करणारे पोलिसांच्या हाती लागत होते. वाकड परिसरात तर मतदार स्लिपसह प्रतिमतदार पाच हजार याप्रमाणे घराघरांत चक्क नोटा पोहोचविण्यात आल्याची चर्चा आहे. उमेदवारापैकी कोणालाही न भेटता दरवाजाखालून नोटा प्रत्यक्ष घरात पडल्याने नागरिकांना आश्चर्य वाटले. प्रतिमताचा भाव फुटला असून, पिंपळे सौदागरमध्ये पाच हजार, रहाटणीत ४, चिंचवडमध्ये ५, काळेवाडीत ४, पिंपरीत ५ हजार रुपये आणि भोसरीत सर्वाधिक १० हजार रूपये भाव होता. मतदारांना विविध वस्तू वाटप केल्याच्या, पैसे वाटप केल्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले, तर काही ठिकाणी तडजोडीने प्रकरणे मिटली. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहणारा मतदार या निवडणूक प्रक्रियेत थेट सहभागी होत नाही. अशा मतदारांची मतदारयादीतील नावे घेऊन थेट त्यांच्या घरात मतदार स्लिपबरोबर जेवढ्या व्यक्ती त्यानुसार नोटा टाकल्या जात आहेत.(प्रतिनिधी)बंदोबस्त गरजेचा सलग दोन, तीन आणि चार टर्म नगरसेवक राहिलेले नगरसेवकही याला अपवाद राहिले नाहीत. प्रभाग क्रमांक १०, १९ मध्ये अशाच उमेदवारांनी पैशांचे वाटप केले. दहशतवाद, भ्रष्टाचारमुक्त शहर अशी निवडणुकीत भाषणबाजी करणारे उमेदवारच नोटा वाटपात आघाडीवर असल्याचे दिसून आले.  मतदानाच्या आदल्या दिवशी, तर रात्री घरोघरी जाऊन मतदारांना पैसे वाटप करण्यात आले. मतदान मंगळवारी सकाळी साडेसातपासून सुरू होणार असल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत पैसे वाटपाचे नियोजन कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे बंदोबस्त वाढविण्याची मागणी होत आहे.