शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात बंद दरम्यान कोणत्याही मोर्चाला परवानगी नाही; नियम पाळण्याचे पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 21:23 IST

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे.

ठळक मुद्देसर्व पक्ष, संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांशी पोलिसांचा संवाद

पुणे : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उद्याच्या (दि.८) भारत बंदला विविध राजकीय पक्ष, संघटनांची पाठिंबा दिला आहे. शहर पोलिसांनी कोणत्याही मिरवणुका, मोर्चांना परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सर्व नियम पाळून बंद शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जर कोणी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये, यासाठी महत्वाच्या सर्व ठिकाणी पोलीस पथकाची नेमणूक केली आहे. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करावे. पुणेकरांनी जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी. दुकाने बंद करणे अथवा कोणताही अनुचित प्रकार करु नये. कोणताही पक्ष, संघटनां यांना मोर्चा काढण्यास परवानगी दिलेली नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले. एकाच ठिकाणी थांबून निवेदन देण्यास परवानगी देण्यात आली आहे.........सर्व पक्ष, संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांशी पोलिसांनी संवाद साधला असून कोणालाही मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी शांततेत बंद पार पाडावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

-अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmer strikeशेतकरी संपPoliceपोलिस