शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्यांचे नुकसान नको : हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST

इंदापूर : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांतून जाणार आहे. या बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांना ...

इंदापूर : मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांतून जाणार आहे. या बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. बागायती शेतीचे नुकसान होऊ नये, असा रेल्वे मार्ग निवडावा, संपादित जमिनीला चांगला मोबदला देण्यात यावा, असे निवेदन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे दिले.

बागायती शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा बुलेट ट्रेनचा मार्ग असेल, संपादित जमिनीस समाधानकारक मोबदला दिला जाईल ,तसेच रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वजण पुन्हा बैठक घेऊ, अशी ग्वाही या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शब्द दिला.

केंद्र सरकारचा मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा बुलेट ट्रेन मार्ग जाणाऱ्या इंदापूर, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. इंदापूर तालुक्यातूनही हा रेल्वे मार्ग जाणार आहे. इंदापूर तालुक्यात एकूण ४ प्रस्तावित मार्गाचे रेल्वेने सर्वेक्षण केले आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

बुलेट ट्रेन प्रकल्प देशहिताचा असल्याने व स्थानिक परिसराचा विकास होणार असल्याने बुलेट ट्रेनला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, बुलेट ट्रेन मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करताना शक्यतो जिराईत जमिनीचा विचार व्हावा. संपादित जमिनीला अतिशय चांगला मोबदला मिळावा, संपादित जमिनीच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना रेल्वे नोकरीत प्राधान्य व इतर लाभ मिळावेत, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे केल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपण एकमेकांशी संपर्कात राहू, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात ग्वाही दिल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.