सुप्याच्या सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:34+5:302021-02-05T05:04:34+5:30

येथील ग्रामसचिवालय सभागृहात तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीनच्या दरम्यान सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अविश्वास ...

The no-confidence motion against Supa's sarpanch was rejected | सुप्याच्या सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला

सुप्याच्या सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला

येथील ग्रामसचिवालय सभागृहात तहसीलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी साडेतीनच्या दरम्यान सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली.

मात्र प्रत्यक्षात अविश्वास ठराव आणलेल्या दहा सदस्यांपैकी रेखा चांदगुडे, राजश्री धुमाळ, गणेश जाधव, अशोक सकट आदी चार तर राहिलेल्या सदस्यांपैकी उपसरपंच मल्हारी खैरे, सुमन जगताप आदी दोन सदस्य आणि सरपंच स्वाती हिरवे असे एकूण सात जण विशेष सभेला उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पाटील यांच्या समोर सरपंच स्वाती हिरवे यांच्यावरील अविश्वास ठराव विशेष सभेत आला नाही. त्यामुळे चर्चा आणि मतदान न घेताच अविश्वास ठराव बारगळल्याची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी मंडलाधिकारी राहुल जगताप, तलाठी सचिन मारकड आणि ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर उपस्थित होते.

तहसीलदार पाटील यांच्यासमोर मागील बुधवारी (दि.२७) दहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्याने येत्या २ फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सभेत ठराव आला नसल्याने तो बारगळल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: The no-confidence motion against Supa's sarpanch was rejected