‘आयएमए’ पुणे शाखेचे नवे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST2021-04-11T04:09:34+5:302021-04-11T04:09:34+5:30

या प्रसंगी डॉ. देशमुख म्हणाले की, इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारतातील ‘आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील’ वैद्यकीय व व्यावसायिकांची सर्वात मोठी ...

The new president of IMA Pune branch, Dr. B. L. Deshmukh | ‘आयएमए’ पुणे शाखेचे नवे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख

‘आयएमए’ पुणे शाखेचे नवे अध्यक्ष डॉ. बी. एल. देशमुख

या प्रसंगी डॉ. देशमुख म्हणाले की, इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारतातील ‘आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील’ वैद्यकीय व व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना आहे. आयएमए पुणे शाखेची सभासद संख्या ४८०० आहे ती सातत्याने वाढविण्याची माझी इच्छा आहे. सध्या रुग्ण व वैद्यकीय व्यावसायिक यांच्यामध्ये गैरसमजुतीमुळे दरी निर्माण होऊन वैद्यकीय व्यावसायिक त्यांचे मदतनीस, दवाखाने व हॉस्पिटल यांच्यावर हल्ले होत आहेत, असे प्रसंग तसेच कोविड १९ ची महामारीला रोखण्यास मी प्राधान्य देईन.’’

या संघटनेचे डॉ. सुनील इंगळे व डॉ. सौ. अलका क्षीरसागर मानद सचिव म्हणून या नात्याने काम बघतील. पुढील वर्षासाठी नियोजित अध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. राजू वरयानी, कोषाध्यक्ष डॉ. राजन संचेती, सहसचिव म्हणून डॉ. गीतांजली शर्मा व डॉ. केदार पाटील काम बघतील.

Web Title: The new president of IMA Pune branch, Dr. B. L. Deshmukh