शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

‘राजडोसा’मुळे मनसे स्वीकृत सदस्य निवडणुकीत तटस्थ

By admin | Updated: May 13, 2015 03:04 IST

राष्ट्रवादीबरोबर जवळीक वाढवीत पदे पदरात पाडून घेत स्वीकृत सदस्य निवडीतही राजकारण करण्याच्या मनसेच्या स्थानिक नेत्यांना

पुणे : राष्ट्रवादीबरोबर जवळीक वाढवीत पदे पदरात पाडून घेत स्वीकृत सदस्य निवडीतही राजकारण करण्याच्या मनसेच्या स्थानिक नेत्यांना राज ठाकरे यांनी चांगलेच फैलावर घेतले. सामाजिक कार्यकर्त्यांऐवजी राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याच्या प्रयत्नाबाबतही कानउघाडणी केली. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसपुढे मात्र अडचण निर्माण झाली आहे. स्थायी समिती व प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादीला साथ दिली होती. यंदाही मनसेच्या भरवशावरच राष्ट्रवादीने रणनीती आखली होती. मात्र, मनसे तटस्थ आणि काँग्रेसनेही हात वर केल्याने ऐन वेळी ‘एकला चलो रे’ अशी परिस्थिती राष्ट्रवादी कॉँग्रेसवर ओढविली आहे. काँग्रेस आघाडीतील बिघाडीचा फायदा भाजपा व शिवसेना युतीला होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी तीन सदस्यांची निवड बुधवारी ११ वाजता होणार आहे. एका नगरसेवकाला कमाल तीन मते देण्याचा अधिकार आहे. प्रभाग समिती अध्यक्ष व सहायक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांऐवजी राजकीय कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीने स्वीकृत सदस्य निवडीत मनसेचा पाठिंबा गृहीत धरला होता. मात्र, मनसेतील प्रमुख नगरसेवकांनीच स्वीकृत सदस्य निवडीत रस दाखविला नाही. शहराध्यक्ष बाळा शेडगे, गटनेते बाबू वागस्कर, अ‍ॅड. किशोर शिंदे, वसंत मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. त्या वेळी झालेल्या चर्चेनंतर ठाकरे यांनी सामाजिकऐवजी राजकीय कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लावण्यासाठी विरोध दर्शविला. मनसेने स्वत: सामाजिक कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी उभे करायचे होते, असेही सुनावले. स्थायी समिती अध्यक्ष व पीएमपी संचालक निवडीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली होती. त्यामुळे काँग्रेसला प्रभाग समिती अध्यक्ष निवडीत १५ पैकी केवळ एकच पद मिळाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीतील बिघाडी, मनसेच्या तटस्थ भूमिकेचा फायदा भाजपा व शिवसेना युतीला होण्याची शक्यता आहे. ऐन वेळी राजकीय समीकरण बदलल्यामुळे कोणत्या पक्षातील किती सदस्यांना संधी मिळते याची उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)