Nasrapur Police Custody News : सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके; नसरापूर प्रकरण : आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:40 IST2026-05-08T09:37:12+5:302026-05-08T09:40:54+5:30
याबाबतचा तपास करण्यासाठी आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयाने (पोक्सो) आरोपीला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Nasrapur Police Custody News : सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर दिसले बोचके; नसरापूर प्रकरण : आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ
Marathi News: पुणे : नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्हीत त्याच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसून येत आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या असून, त्या धारदार हत्याराने केल्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. याबाबतचा तपास करण्यासाठी आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार विशेष न्यायालयाने (पोक्सो) आरोपीला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयानेही यावर कोणतीही हरकत घेतली नाही. सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयात सांगितले की, चिमुरडीवर अत्याचार केल्यानंतर पळून जाताना सीसीटीव्हीत आरोपीच्या खांद्यावर बोचके असल्याचे दिसले आहे. त्या बोचक्यामध्ये काय आहे? ते कुठे लपवून ठेवले आहे. त्याबाबत तपास करायचा आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मुलीच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसत आहे. त्या धारदार हत्यारामुळे झाल्याची शक्यता आहे. हे कसले हत्यार वापरले आहे? त्याचा तपास करायचा आहे. या प्रकरणातील अजून काही महत्त्वाचे पुरावे व मुद्द्यांची पडताळणी बाकी असल्याने ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी केली.
चिमुकलीचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचे उघड
नसरापूर येथी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व तिचा निर्घृण खून केल्या प्रकरणात तांत्रिक व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. तपासात तिचा मृत्यू श्वास गुदमरून झाला असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आरोपीच्या मागील कोणत्याही केसेस ओपन केल्या जाणार नाहीत. मात्र, याच गुन्ह्यात त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिले आहे.