शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचा राज्यपालांवर हल्लाबोल; म्हणाले, 'खुर्ची सोडा मगच आम्ही उत्तर देऊ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 16:23 IST

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती

ठळक मुद्देनाना पटोले यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार

पुणे : राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार नाहीत. ते भगतसिंह कोश्यारी म्हणून बोलत असतील. तो त्यांचा अधिकार आहे. मग त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. मग आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ. असा हल्लाबोल करत पटोलेंनी राज्यपालांना लगावला आहे.

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपालांनी केली होती. त्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका करणे राज्यपाल यांना शोभत नाही.टीका करायची तर खुर्ची सोडा, मग आम्ही बघू, असा टोला पटोले यांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपालांनी भाजपचा कार्यकर्ता बनावं, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावं, असंही पटोले म्हणालेत. 

पुण्यात नाना पटोले यांच्या हस्ते पूरग्रस्तांना आज मदत पाठवण्यात आली. सारसबाग चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनही केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधता होते. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कोल्हापूर पूर पाहणीदरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीबाबत काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही. काँग्रेस सरकारची जासूसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करतंय असं ते म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भेट दिलेली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा आहे ते काय मदत करतात ते पाहू वादळाच्या वेळेस त्यांनी गुजरातला भेट दिली. मात्र महाराष्ट्राला भेट दिलेली नाही. त्यामुळे आता पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील हे पाहावे लागेल. 

मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार

पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मेट्रोचा पाया रोवला गेला. म्हणून आज या पक्षाने सात वर्षे देश मागे नेला आहे. त्याला श्रेय घ्यायचा असेल तर त्यांना लखलाभ असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. त्याचबरोबर मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहोत असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाcongressकाँग्रेस