शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:56 IST

1 / 6
घर सजवताना आपण अनेकदा रंगांचा आणि फर्निचरचा विचार करतो, पण भिंतींवर लावलेली चित्रं आपल्या प्रगतीची दिशा ठरवतात. वास्तू शास्त्रानुसार, विशिष्ट ऊर्जा आकर्षित करणारी काही चित्रं घरात असणं अत्यंत लाभदायक ठरतं.
2 / 6
कामधेनु ही पौराणिक काळापासून 'इच्छापूर्ती' करणारी गाय मानली जाते. तिचे वासरासह असलेले चित्र किंवा मूर्ती घरात असणे अत्यंत शुभ असते. यामुळे घरात अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही. मानसिक शांती लाभते. कामधेनुचे चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात (North-East) लावावे.
3 / 6
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र खूप लोकप्रिय आहे. हे चित्र प्रगती, वेग आणि शक्तीचे प्रतीक आहे. व्यवसायात किंवा नोकरीत येणारे अडथळे दूर होतात. हे चित्र पूर्व (East) किंवा दक्षिण (South) भिंतीवर लावावे. लक्षात ठेवा, घोड्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूला असावे.
4 / 6
कौटुंबिक सुख आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी चित्रांची निवड महत्त्वाची असते. दोन हंसांची जोडी किंवा राधा-कृष्णाचे चित्र लावल्याने घरातील नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आणि नकारात्मकता दूर होते. हे चित्र नैऋत्य कोपऱ्यात (South-West) म्हणजेच घराच्या दक्षिण-पश्चिम भागात लावावे.
5 / 6
पाणी हे समृद्धीचे आणि पैशांच्या ओघाचे प्रतीक मानले जाते. शांतपणे वाहणाऱ्या पाण्याचे चित्र घरात असल्यास उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतात. जडपणा किंवा कामात आलेली सुस्ती दूर होते. पाण्याचे चित्र नेहमी उत्तर (North) किंवा ईशान्य (North-East) दिशेला असावे.
6 / 6
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मन प्रसन्न राहते आणि बुद्धी तल्लख होते. हिरवळीचे चित्र घरातील मुलांच्या अभ्यासासाठी आणि एकाग्रतेसाठी उत्तम असते. यामुळे घरातील 'वायू' तत्व संतुलित राहते. हे चित्र पूर्व (East) दिशेला लावणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजनHome Decorationगृह सजावट