शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माझे बाबा तर माझे ऐकत नाही; तुम्ही ऐकणार ना! ३ वर्षांच्या पोलीस कन्येची आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 22:19 IST

स्वतःच्या घरीही राहावे लागते पोलिसांना वेगळे

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल

पुणे : माझे बाबा पोलीस आहेत. मी माझ्या बाबांना कोरोनामुळे घराबाहेर जाऊ नका सांगते पण ते ऐकतच नाहीत. मात्र तुम्ही ऐकणार ना ! अशी भावनिक साद घातलेल्या एका चिमुकलीचा हात जोडलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रीजा शैलेश चव्हाण असे या पोलीस कन्येचे नाव असून तिचे वडील शैलेश चव्हाण हे सध्या सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन केलं आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. हा जनता कर्फ्यूच्या पुढील टप्पा असेल, असंही त्यांनी नमूद केलं. यानुसार घराच्या बाहेर पडण्यावर बंदी असली तरीही नागरिक कोणत्याही कारणांनी घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना हात जोडून विनंती करीत असल्याचे चित्र व्हायरल झाले आहे. माझे पप्पा पोलीस आहेत. मी माझ्या पप्पांना कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर जाऊ नका सांगते पण ते ऐकत नाहीत, काहीही झालं तरी ड्युटीवर जावंच लागेल पण तुम्ही सगळे माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्या पप्पांसारख्या सगळ्या पोलीस, डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी बाहेर पडू नका ,अशी विनंतीही तिने केली आहे.  
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. डॉक्टर, पोलीस इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांरी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कामाला लागले आहेत.  मात्र, त्याला नागरिकांची साथ देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता नागरिकांनी त्यांचं स्पिरीट दाखवण्याची वेळ आता आली आहे.

..............

स्वतःच्या घरीही राहावे लागते पोलिसांना वेगळे

कोरोना व्हायरसमुळे सध्या महाराष्ट्र पोलीस महत्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडत आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हाही दाखल करीत आहेत. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, तसेच त्यांना कोरोना विषाणूपासून रोखण्यासाठीच सध्या पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. मात्र आम्हा पोलिसांना घरी गेल्यानंतर मात्र वेगळ्या खोलीत जेवण तसेच राहावे लागत आहे. कारण आम्हालाही कुटुंब असल्याने त्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याने आम्ही स्वतःहूनच सध्या घरात वेगळे राहत असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने 'लोकमत' प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस