मंचर येथे गळफास देऊन एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:08 IST2021-07-15T04:08:39+5:302021-07-15T04:08:39+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: दत्तात्रेय उर्फ पिंटू सोमनाथ ठाकूर (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंचर ...

Murder of one by hanging at Manchar | मंचर येथे गळफास देऊन एकाचा खून

मंचर येथे गळफास देऊन एकाचा खून

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: दत्तात्रेय उर्फ पिंटू सोमनाथ ठाकूर (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंचर गावच्या हद्दीत मुळेवाडी रोड, वाघवाडी येथे विजय थोरात यांच्या खोलीमध्ये कैलास सोमनाथ ठाकूर हा भाडेकरू म्हणून राहत होते. गुरुवार, दि. ८ ते सोमवार दि.१२ यादरम्यान आरोपी दीपक साळुंखे उर्फ फारुख याने फिर्यादीचा भाऊ कैलास सोमनाथ ठाकूर याचा खून केला. अज्ञात कारणावरून कैलास यांच्या गळ्यात दोरीने गळफास देऊन त्याचा खून करण्यात आला आहे. दत्तात्रेय ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक साळुंखे उर्फ फारुख याच्या विरोधात मंचर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी भेट दिली आहे. मंचर पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Murder of one by hanging at Manchar