विमा कामगार रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

By Admin | Updated: July 9, 2015 03:05 IST2015-07-09T03:05:31+5:302015-07-09T03:05:31+5:30

राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आवारातील विविध देशी वृक्षांची बेकायदा तोडणी संबंधित विभागाच्या प्रशासनाने केली.

Municipal Corporation Notice to Insurance Workers Hospital | विमा कामगार रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

विमा कामगार रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

पुणे : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या आवारातील विविध देशी वृक्षांची बेकायदा तोडणी संबंधित विभागाच्या प्रशासनाने केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्यान विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर उद्यान विभागाने तातडीने दखल घेत संंबंधित रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बिबवेवाडी येथे राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय आहे. त्या ठिकाणी वाढीव बांधकाम करण्याच्या उद्देशाने परिसरातील बोर, सुबाभूळ, हिवर, काटेरी बाभूळ, कडुनिंब अशी १० ते ३५ वर्षे वयाची झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, त्यासाठी उद्यान विभाग व उच्च न्यायालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.
त्याविषयीची तक्रार स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी मोहन ढेरे यांनी जागेवर पंचनामा करून संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनाला नोटीस बजावली आहे. मात्र, केवळ नोटीस बजावून उपयोग होणार नाही.
संबंधित संस्था शासकीय असल्याने महापालिका कारवाईस टाळाटाळ करीत आहे. शासकीय
संस्था असूनही बेपर्वाई केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल
करण्याची मागणी स्थानिक कार्यकर्ते लखन आरे व भरत सुराणा यांनी महापालिका आयुक्तांकडे नुकतीच केली आहे. (प्रतिनिधी)

कामगार विमा रुग्णालयाला तक्रारीनंतर तातडीने नोटीस बजावली आहे. येत्या १० दिवसांत संबंधितांकडून खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- मोहन ढेरे, वृक्ष अधिकारी, उद्यान विभाग.

Web Title: Municipal Corporation Notice to Insurance Workers Hospital