शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 07:00 IST

सिंगापुर व अबुधाबीकडे जाणाऱ्या विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता..

ठळक मुद्देसध्या पुणे विमानतळावरून केवळ दुबई ही एकमेव आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू

पुणे : जेट एअरवेज कंपनी बंद पडल्यानंतर सिंगापुर, अबुधाबी या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह मुंबई, इंदौर व कोईम्बतुर ही विमाने मागील काही महिन्यानंतरही जमिनीवरच आहेत. इतर विमानकंपन्यांकडून या शहरांसाठी सेवा सुरू करण्यास उदासिनता दाखविली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर पयार्यांचा विचार करावा लागत आहे. तसेच पुणे विमानतळावरील विमानांची दैनंदिन ये-जा १९० वरून १८० पर्यंत खाली आली आहे.मागील काही वर्षात पुणे विमानतळावरून विमानाने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही संख्या पुढील वर्षभरात एक कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विमानतळावरून सध्या दुबई या एकमेव आंतरराष्ट्रीय उड्डाणासह दिल्ली, बेंगलुरू, कोची, अहमदाबाद, गोवा, चेन्नई, कोलकाता, हैद्राबाद, जयपुर, बेळगाव, चंदीगढ, भोपाळ व नागपुर या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. तर मार्च महिन्यापर्यंत सिंगापुर व अबुधाबी या शहरांसाठीच्या सेवाही सुरू होता. देशांतर्गत सेवांमध्ये मुंबई, इंदौर व कोईम्बतुर शहरांच्या सेवा काही पाच महिन्यांपर्यंत सुरू होत्या. जेट एअरवेज कंपनीकडून या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ही कंपनी बंद पडल्यानंतर टप्प्याटप्याने सर्व विमाने जमिनीवर आली. सिंगापुर व अबुधाबीकडे जाणाऱ्या विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पुण्यातून जाताना शनिवारी व येताना शुक्रवारी हे दिवस सोडल्यास आठवड्यातील इतर सर्व दिवशी विमानाचे उड्डाण होत होते. प्रत्येक उड्डाणाला ८० ते ८५ टक्के प्रवासी होते. पण विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांना इतर पर्याय निवडावे लागत आहेत. बहुतेक प्रवासी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलुरू विमानतळावरून सिंगापुर, अबुधाबीकडे जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसाही खर्ची पडत आहे. मागील वर्षी जर्मनीतील फँकफर्टची विमानसेवाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद तसेच विमान कंपनीलाही ही सेवा परवडत नसल्याचे बंद करण्यात आली आहे. ही सेवा पुन्हा सुरू होण्याबाबत सध्या कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे सध्या पुणे विमानतळावरून केवळ दुबई ही एकमेव आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. ----------------

टॅग्स :Puneपुणेairplaneविमानpassengerप्रवासी