शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात नवा कायदा, सर्वसामान्यांना भरडणाऱ्या बँका कायद्याच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 15:40 IST

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर उतरल्यानंतर लगेच बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेराव घालून त्यांच्यासमोर

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर अर्थमंत्र्यांना पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव घातल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून खातेदारांचे म्हणणे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपर्यंत पोहोचवल्याचं, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, आज पुणे येथील दौऱ्यावेळीही सीतारामन यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली. त्यावेळी, येत्या हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

मुंबईतील भाजप कार्यालयासमोर उतरल्यानंतर लगेच बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेराव घालून त्यांच्यासमोर ‘न्याय द्या, न्याय द्या’, अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सीतारामन म्हणाल्या, पीएमसी बँकेचे खातेधारक आल्याचे समजल्यावर मी त्यांना भेटायला बोलवाले. काहीजण बँक लुटून गेले आणि आता लाखो ठेवीदार अडचणीत आहेत. पीएमसी ही बहुराज्यीय सहकारी बँक आहे. मी आरबीआयच्या गव्हर्नरशी संपर्क केला असून लवकरात लवकर पीएमसी बँकेची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितल्याचं सितारमण यांनी सांगितल. तसेच, येत्या हिवाळी अधिवेशनात मल्टिस्टेट बँकेचा कायदा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. ज्यात सर्वसामान्य भरडले जातात, त्या बँकांना कायद्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.   अमेरिका आणि भारतामधील व्यापारसंबंध सुधारतील. व्यापार आणि आर्थिक निर्णयांविषयी अर्थमंत्रीच निर्णय घेतील. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची केमिस्ट्री उत्तम होती, हे सगळ्यांनी बघितलंय. आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची उत्तम किंमत देऊ इच्छितो. कांदे आणि लसूण टिकावेत म्हणून काही करता येईल का, यासाठी भामा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे. त्यामुळे सरकारला दोषी धरणे चुकीचे आहे, असेही सितारमण यांनी म्हटले. 

दरम्यान, लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या चाकांखाली लिंबू ठेवण्यात आल्याने विरोधकांसह सोशल मीडियावरुनही त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याचं स्पष्टीकरण माजी संरक्षणमंत्री आणि विद्यमान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिलंय. तसेच, ही श्रद्धा असून अंधश्रद्धा नसल्याचंही सितारमण यांनी म्हटलं.   

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbankबँकPMC Bankपीएमसी बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रPuneपुणेAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019