पोतराजाच्या वेशात आंदोलन

By Admin | Updated: August 31, 2015 04:10 IST2015-08-31T04:10:46+5:302015-08-31T04:10:46+5:30

भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) कात्रज-कोंढवा रस्त्याच्या

The movement of prostitutes | पोतराजाच्या वेशात आंदोलन

पोतराजाच्या वेशात आंदोलन

धनकवडी : भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करण्यास चालढकल करत असल्याने मनपाविरोधात भाजपा हडपसर मतदारसंघातर्फे अभिनव आंदोलन करण्यात आले.
या वेळी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोतराजाच्या वेशात येऊन रस्तारुंदी लवकर होण्यासंबंधी घोषणा देत व फटके मारून क्लेश करून घेत हे आंदोलन केले. सुमारे ५००० स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री रवी भुसारी, नगरसेविका रंजना टिळेकर, सुनील कामठे, सुहास शेलार, मारुती तुपे, भूषण तुपे, जीवन जाधव, आबा शिंगोटे, संकेत झेंडे, अमित गायकवाड, संदीप बेलदरे, संदीप दळवी, योगेश ससाणे, सुनील धुमाळ, पोपटराव लोणकर, संभाजी कामठे, दादा लोणकर, चेतन टिळेकर, नितीन शेलार, संजय कपिले हे या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The movement of prostitutes