शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द केल्यास आंदोलन

By admin | Updated: June 2, 2014 01:41 IST

पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात फेडरेशनची बैठक झाली. राज्यातील २७ महापालिकांच्या कामगार संघटनांनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते

पिंपरी : एलबीटी कराविषयीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून व्यापार्‍यांच्या दबावाखाली महाराष्ट्रातील महानगरपालिकांची एलबीटी कायमस्वरुपी काढून टाकण्याचा निर्णय २ जूनला होणार्‍या विधानसभा अधिवेशनात होणार असून एलबीटी रद्द केल्यास बेमुदत आंदोलन करू, राज्य सरकारविरोधात लढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य महानगरपालिका आणि नगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शरद राव यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात फेडरेशनची बैठक झाली. राज्यातील २७ महापालिकांच्या कामगार संघटनांनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सर्वांनी आपापले झेंडे व मतभेद विसरून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या वेळी पिंपरीचे शशिकांत झिंजुर्डे, नवी मुंबईचे सुरेश ठाकूर, कल्याण डोंबिवलीचे नवनाथ महारनवर, औरंगबादचे गौतम खरात, सोलापूरचे अशोक जानराव, पुणेचे बापू पवार, प्रकाश जाधव, मधुकर नरसिंगे, सांगलीचे दिलीप शिंदे, ठाणेचे रवी राव, बेस्ट वर्कर्स युनियनचे रंगनाथ सातवसे, पीएमपीएमएलचे संजय कुटे आदी उपस्थित होते. राव म्हणाले, ‘‘केवळ राजकीय व मतांचा विचार करून किंवा व्यापार्‍यांच्या दबावाखाली येऊन सरकारने अशा रितीने हा विषय हाताळणे म्हणजे भारतीय घटनेची पायमल्ली असून उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्यासारखे आहे. एलबीटी रद्द केल्यास रक्कम रुपये १६ हजार कोटी एवढी रक्कम राज्य सरकारला कशी उभी करता येईल. या संदर्भात संघटनांशी चर्चा न करता निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ जून पासून सर्व महापालिकातील कर्मचारी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करणार आहोत. फेडरेशनबरोबर चर्चा न करता व मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची निर्णयाची वाट न पाहता एलबीटी रद्दचा प्रयत्न झाल्यास ८ जून मध्यरात्रीपासून पालिकातील कामगार कर्मचारी ‘बेमुदत आंदोलन’ करणार आहेत.’’(प्रतिनिधी)