शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात, पाच शहरांना जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:43 IST

पाच शहरांना जास्त धोका : ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ संस्थेचे संशोधन

पुणे : ‘डिजिटल इंडिया’ म्हणून देशाची ओळख असली, तरी सायबर हल्ल्यांनी अनेकांची झोप उडवली आहे. पुण्यात रोज दहा ते पंधरा सायबर हल्ले होत असून, त्यास ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. देशात सर्वाधिक सायबर हल्ले महाराष्ट्रात होत आहेत. ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना ‘आयटी’ सुरक्षा व ‘डेटा प्रोटेक्शन’ सुविधा देणाऱ्या ‘क्विक हील टेक्नॉलॉजीस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

महाराष्ट्र व दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना २०१९ मध्ये सर्वात जास्त लक्ष्य करण्यात आले. महाराष्ट्रात ३ कोटी ८० लाख, तर दिल्ली एनसीआरमध्ये २ कोटी ५० लाख ‘सायबर थ्रेट’ उघड झाले. पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात यांनाही सायबर हल्ल्यांचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता व पुणे या शहरांवर सायबर गुन्हेगार लक्ष ठेवून आहेत. देशात रोज २० लाखांहून अधिक ‘सायबर थ्रेट’ उघड झाले.या अहवालाविषयी संशोधन संस्थेचे संचालक संजय काटकर म्हणाले, खासगी माहिती विकून पैसे कमावण्यासाठी असुरक्षित डिजिटल डिव्हायसेस हॅक केले जातात. त्याकरिता सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रांचा वापर करत आहेत. समाजासाठी धोकादायक कारस्थाने केली जातात, अशा ठिकाणी ही माहिती विकली जाते. जागरूकतेचा अभाव, असुरक्षितता व जुन्या आॅपरेटिंग सिस्टिम्स यांमुळे ग्राहक त्यांना सहजपणे बळी पडतात.वायफाय राऊटर्सवरही हल्लेडिजिटल धोक्यांपासून वाचण्यासाठी वायफाय राऊटर्स सारखी साधने सुरक्षित असूनही सायबर गुन्हेगारांनी नव्या पद्धतींद्वारे त्यांच्यावरही हल्ले केले. स्मार्ट टीव्ही, फोन, आयपी कॅमेरे यासारख्या स्मार्ट आयओटीवर आधारित डिव्हाइसमधील असुरक्षिततेचाही त्यांनी वापर केला आहे.स्मार्टफोन असुरक्षितसायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने ते ओळखणे वा पकडले जाणे अवघड होत आहे. स्मार्टफोन सर्वाधिक असुरक्षित व सायबर गुन्ह्यांना पटकन बळी पडू शकतील अशा डिजिटल डिव्हायसेसपैकी एक आहेत. स्पायवेअर व मालवेअर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या अ‍ॅप्सवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरण्याचे प्रयत्न हॅकर्सनी २०१९ मध्ये केले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसdigitalडिजिटल