पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:09 IST2026-01-24T18:08:19+5:302026-01-24T18:09:43+5:30

उसने घेतलेले तब्बल १८ लाख परत द्यावे लागतील असे समजून त्याने साथीदारांच्या मदतीने मित्राचा खून केला

Money dispute Face disfigured by throwing a stone at the head Friend murdered by friend in a very gruesome manner in Pune | पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून

पैशांचा वाद! डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप; पुण्यात अत्यंत भयानक पद्धतीने मित्राकडून मित्राचा खून

पुणे : पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप करुन खून केला. खून झालेल्याचे नाव निष्पन्न देखील झालेले नसताना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने खून झालेल्याचे नाव निष्पन्न करुन चौघा आरोपींच्या १२ तासांच्या आत मुसक्या आवळल्या. राजेंद्र सुभाष ऐलगच्चे (४०, रा. स्वराज आर्केड, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी शुभम राजेश शिंदे (२५, रा. ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी), लकी सुरेंद्र सिंग (२३, रा. खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी), सुनील संतोष खलसे ऊर्फ एस. के. (१९, रा. संभानगर झोपडपट्टी, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

वारजे येथील आकाशनगर जवळील वन विभागाच्या टेकडीवरील सिमेंटच्या विसाव्या शेजारील निर्जन जागेत एकाचा मृतदेह वारजे पोलिसांना शुक्रवारी (दि. २३) मिळाला होता. कोणीतरी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारून तसेच दगडाने चेहरा ठेचून त्याचा खून केला होता. त्याची ओळख पटली नव्हती. वारजे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. सहायक फौजदार बाळू गायकवाड व पोलिस अंमलदार साई कारके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पूल वारजे दरम्यान दोन संशयित थांबले असून त्यांची काहीतरी गुन्हा केल्याचे त्यांच्या हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा कावडे व अंमलदार तेथे गेले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. त्या दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडील माहितीवरून अन्य दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर राजेंद्र ऐलगच्चे यांनी एकाला १८ लाख रुपये दिले होते. ती वसुली करुन देतो, असे सांगून शुभम शिंदे याने ११ लाख रुपये घेतले होते. हे पैसे राजेंद्र ऐलगच्चे मागत होता. राजेंद्र ऐलगच्चे याला संपवले तर आपल्याला पैसे द्यावे लागणार नाही, असे समजून त्याने साथीदारांना मदतीला घेतले. राजेंद्र ऐलगच्चे यांना वारजे येथील शनी मंदिर टेकडी येथे २१ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता बोलवले. त्याप्रमाणे राजेंद्र ऐलगच्चे तेथे आले. तेव्हा शुभम व त्याच्या साथीदारांनी लोखंडी हत्याराने गळ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर वार केले. डोक्यात दगड घालून त्यांचा चेहरा विद्रूप करुन टाकला. आरोपींना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

Web Title : पुणे: पैसों के विवाद में दोस्त ने दोस्त का किया कत्ल, पत्थर से चेहरा बिगाड़ा

Web Summary : पुणे: पैसों के विवाद में एक दोस्त ने साथियों के साथ मिलकर दूसरे दोस्त की हत्या कर दी। आरोपियों ने पत्थर से चेहरा बिगाड़ दिया। पुलिस ने 12 घंटे के अंदर चार संदिग्धों को गिरफ्तार कर मृतक की पहचान राजेंद्र ऐलगच्चे के रूप में की।

Web Title : Pune: Friend Murders Friend over Money; Face Disfigured with Stone

Web Summary : Pune: A man was murdered by his friend and accomplices over a financial dispute. The victim's face was disfigured with stones. Police arrested four suspects within 12 hours, identifying the deceased as Rajendra Ailagacche.