पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे तरुणावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:10 IST2021-04-20T04:10:37+5:302021-04-20T04:10:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजविण्यासाठी ...

The mob attacked the youth out of prejudice | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे तरुणावर वार

पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे तरुणावर वार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करीत राडा घातला. खडक पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तजमूल पठाण, अबिद मोकाशी, इम्रान खान, तौसिफ खान, फैजल मुजाहिद्द (सर्व रा. मोमिनपुरा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. अभिषेक ऊर्फ बाप्पा कसबे (वय ३१, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडे पेठेतील नेहरु मित्र मंडळाजवळ १६ एप्रिल रोजी रात्री सव्वाअकरा वाजता घडली़

अभिषेक आणि त्यांचा मेव्हणा गणेश मोरे दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरुन गुरूवार पेठेतील मित्राला भेटण्यासाठी चालले होते. त्या वेळी ७ ते ८ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून तजमूल आणि इतर साथीदारांनी अभिषेकला अडविले. त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय गणेश मोरे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. आम्ही इथले भाई आहेत, जर कोणी आमच्या विरोधात गेले तर त्याचा मुडदा पाडू, असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्याशिवाय परिसरातील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे तपास करीत आहेत.

Web Title: The mob attacked the youth out of prejudice