शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST

वानवडी पोलिसांची कारवाई : कचरा टाकून सरकारी कामात अडथळा पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून ओला-सुका कचरा ...

वानवडी पोलिसांची कारवाई : कचरा टाकून सरकारी कामात अडथळा

पुणे : रामटेकडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात घुसून ओला-सुका कचरा फाईल व टेबलांवर टाकून शासकीय कामात अडथळा आणणारे मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता वानवडी पोलिसांनी बाबर व इतरांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली.

वानवडी -रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक कार्यालयात कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणारे मनसे नगरसेवक साईनाथ बाबर व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सहायक आयुक्त किशोरी शिंदे यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडी क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी २२ मार्चला दुपारी घडला होता. सहायक आयुक्त शिंदे या दिल्लीतील पथकासोबत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रभागांतील स्वच्छ सर्वेक्षण योजनेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. साईनाथ बाबर, इंगळे व त्यांचे १० ते १५ कार्यकर्ते महापालिकेने घातलेले निर्बंध न पाळता कार्यालयात शिरले. त्यावेळी उपअभियंता बागडे व प्रभारी अधीक्षक पांडुरंग लोहकरे यांनी त्यांच्याकडे काय काम आहे अशी विचारणा केली. तरीही ते जबरदस्तीने शिंदे यांच्या केबिनमध्ये घुसले. कार्यालयात ओला, सुका व कुजलेला कचरा टाकला. तसेच, कार्यालयातील लॉबीमध्येही कचरा टाकला. तसेच, कार्यालयातील इतर सहकाऱ्यांच्या टेबलवर व कार्यालयातील कागदपत्रे व फाईलींवर कचरा टाकून काम करण्यास अडथळा आणला.

याप्रकरणी साईनाथ बाबर यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर आता वानवडी पोलिसांनी रविवारी रात्री नगरसेवक साईनाथ बाबर यांना अटक केली़ पोलिसांनी बाबर यांना सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांच्यासमोर हजर केले. त्यांनी १५ हजार रुपयांच्या जामिनावर बाबर इतर कार्यकर्त्यांची सुटका केली. सर्वांच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. रुपाली पाटील यांनी काम पाहिले.