मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 15:06 IST2025-08-15T15:06:28+5:302025-08-15T15:06:37+5:30

सायंकाळच्या वेळेत जड वाहनांना मनाई असतानाही चालकाने त्या भागात नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालवला

Mixer truck hits bike; 11-year-old girl dies, mother seriously injured | मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

पिंपरी : हिंजवडी परिसरात जड वाहनांना मनाई असलेल्या वेळेत बेदरकार मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ११ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हिंजवडी, फेज २ येथील इन्फोसिस सर्कलजवळ घडली.

प्रत्युषा संतोष बोराटे (वय ११) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, तर वैशाली बोराटे (३५) जखमी झाल्या. या प्रकरणी सागर सुभाष आगलावे (रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी बुधवारी (दि. १३ ऑगस्ट) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिक्सर ट्रकचालक फरहान मुन्नू शेख (२५, रा. वाकड) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीस मनाई आहे. संशयित फरहान शेख याने या नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालवला. त्याने दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वैशाली बोराटे गंभीर जखमी झाल्या, तर त्यांची मुलगी प्रत्युषाचा मृत्यू झाला.

Web Title: Mixer truck hits bike; 11-year-old girl dies, mother seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.