शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

महापौरपदाच्या निवडणुकीतही आता ‘महाशिवआघाडी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 21:16 IST

पालिकेत नवी समीकरणे : राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसे देणार एकत्र उमेदवार

ठळक मुद्दे भाजपाला आव्हान देण्यासाठी पुण्यातही महाशिवआघाडीचा प्रयोग केला जाणार

पुणे : राज्यातील सत्तासमिकरणे बदलत असतानाच त्याचे परिणाम पुण्यामध्येही पाहायला मिळू लागले आहेत. नुकतीच राज्यातील महापालिकांच्या महापौरपदाची सोडत झाली आहे. पुण्याचे महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छूकांची संख्याही वाढली आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी पुण्यातही महाशिवआघाडीचा प्रयोग केला जाणार असून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन उमेदवार देणार आहेत.   विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपा-सेना युतीला तडा गेला असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत सेनेने चूल मांडायचा प्रयत्न सुरु केला आहे. येत्या काही दिवसातच महाशिवआघाडीचे सरकार आकार घेईल असे चित्र दिसत आहे. महापालिकेतील गेल्या अडीच वर्षातील भाजपाचा कारभार पाहता विरोधी पक्षांनी कायमच आम्हाला विश्वासात घेतले जात नाही असा सूर लावलेला आहे. भाजपाकडून विरोधी पक्षांनाही गृहीत धरले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे केली आहे. सत्ताधाºयांच्या कारभाराला शह देण्यासाठी पालिकेतही नवी समिकरणे आकार घेऊ लागली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याने त्या आमदार झाल्या आहेत. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळेही आमदार झाले आहेत. त्यातच आता महापौर पदाची मुदत संपल्याने महापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी इच्छूक देव पाण्यात ठेवून आहेत. यासोबतच वरिष्ठांच्या भेटीगाठीही सुरु आहेत. सध्या शहरात खासदार गिरीश बापट, संजय काकडे, शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटांचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत. परंतू, यातील एक मोठा गट आपल्याला प्रतिनिधीत्वमिळत नसल्याने नाराज असल्याचे समजते. त्याचा फायदा उचलण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन  महापौरपदासाठी उमेदवार देणार आहेत. या चारही पक्षांचे ६३ नगरसेवक पालिकेत आहेत. तर भाजपाचे ९९ नगरसेवक आहेत. त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. तरीदेखील विरोधी पक्षांनी आपला उमेदवार मैदानात उतरवून लढण्याची तयारी दर्शविली आहे. पालिकेतही महाशिवआघाडीचा निर्णय घ्यायचा किंवा नाही याबाबत आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत आणि पक्षप्रमुखांसोबत पालिकेतीलगटनेते बोलणार आहेत. त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल. तुर्तास पालिकेतही महाशिवआघाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

====

पालिकेतील विरोधी पक्षाचे संख्याबळपक्ष                                    नगरसेवककॉंग्रेस                                १०शिवसेना                            १०मनसे                                ०२राष्ट्रवादी कॉंग्रेस                ४१

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा