शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 07:52 IST

देवेंद्र फडणवीस यांचे ऐकायचे नसेल तर तो तुमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे. आम्ही काय बोलणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्हालाही त्याचपद्धतीने उत्तर द्यावे लागेल असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिला.

मुंबई - राज्यात सत्ताधारी भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या पक्षप्रवेशामुळे महायुतीत तणाव वाढला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपाकडून शिंदेसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे शिंदेसेना आक्रमक झाली आहे. शिंदेसेनेने थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करत भाजपाला इशारा दिला आहे.

पत्रकारांशी बोलताना शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीत वरिष्ठांमध्ये एक आचारसंहिता ठरली आहे. आपापसात एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत मात्र स्थानिक निर्णयामुळे झालेला हा गोंधळ आहे. आम्ही वारंवार युती करा असं सांगतो मात्र काही नेते स्थानिक नेतृत्वावर युती करायची की नाही हे ठरवले जाईल असं बोलायचे. त्यामुळे प्रत्येक नेते एकमेकांविरोधात उभे आहेत. दुर्दैवाने नगरपालिकेची ही निवडणूक कधी नव्हे इतकी चुरशीची झाली आहे. यापुढे छोट्या निवडणुकीत जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो उभं राहण्याची हिंमत करणार नाही असं खेदाने म्हणावे वाटते. एवढा खर्चाचा आगडोंब मी माझ्या राजकीय कारर्किर्दीत पहिल्यांदा पाहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली. प्रत्येक जण टोकाचा विरोध करू लागलेत. येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचे पडसाद निश्चित उमटतील असं त्यांनी सांगितले.

तसेच विरोधक ही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा वणवा जाणवत होता. उबाठाने कुठेही सभा घेतली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, मूळ काँग्रेस असेल कुठेही सभा घेताना दिसले नाही. त्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांच्यात स्पर्धा लागली आणि अस्तित्वाची लढाई जाणवली. महायुतीत जे ठरवले गेले त्याला कल्याण डोंबिवलीत छेद देण्यात आला. रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्सन होणार आहे. महायुती जी खंबीरपणाने पुढे चालली आहे त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार सुरू आहे. रवींद्र चव्हाणांना समज दिली जात नसेल तर उद्या हे प्रकार वाढतील आणि त्याचे दुष्परिणाम महायुतीला भोगावे लागतील असा इशाराही मंत्री संजय शिरसाट यांनी दिला. 

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी खरेतर महाराष्ट्र फिरला पाहिजे परंतु त्यांना कल्याण डोंबिवली यापलीकडे दिसत नाही. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी बाहेर फिरले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचे ऐकायचे नसेल तर तो तुमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे. आम्ही काय बोलणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला तर आम्हालाही त्याचपद्धतीने उत्तर द्यावे लागेल. सर्वसामान्य जनतेचा महायुतीकडे कल आहे. जर अशाप्रकारे फाटाफूट होत असेल तर भविष्यात स्वतंत्र निवडणूक लढावी लागेल असं चिन्ह आहे असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cracks in Maharashtra Alliance? Shinde Sena Warns of Solo Polls

Web Summary : Tensions escalate between BJP and Shinde Sena over party entries and dominance in Thane. Shinde Sena warns BJP leader's actions could fracture the alliance, hinting at contesting future elections independently if discord persists.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटRavindra Chavanरविंद्र चव्हाणBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती