शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 08:53 IST

डेर स्पीगल रिपोर्ट आणि एएफपीच्या हवाल्याने लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेत्यांनी युक्रेन रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकन प्रयत्नांवर अविश्वास दाखवला आहे.

जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज यांच्या एका कॉलनं युरोपियन नेत्यांचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरवसा नसल्याचं उघड झालं आहे. या कॉल लीकमुळे जागतिक चर्चा सुरू झाली आहे. जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांना सावध केले आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिका खेळ करत आहेत, तुमच्यासोबत आणि आमच्यासोबतही असं मर्ज यांनी कॉलवरून सांगितले. जर्मन चांसलरचा हा फोन कॉल युरोपपासून अमेरिका, रशियापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.

डेर स्पीगल रिपोर्ट आणि एएफपीच्या हवाल्याने लीक झालेल्या कॉलमध्ये युरोपियन नेत्यांनी युक्रेन रशिया युद्ध संपवण्याच्या अमेरिकन प्रयत्नांवर अविश्वास दाखवला आहे. यामुळे पाश्चात्या आघाडीत वाढलेला तणाव प्रखरतेने दिसून आला आहे. जर्मन न्यूज वीकलीन म्हटलं की, आम्हाला युक्रेनचे राष्ट्रपती व्हालोडिमिर झेलेन्स्की आणि अनेक युरोपियन देशातील राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेले कॉन्फरन्स कॉलचे लिखित नोट्स मिळाले आहेत. जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्ज आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनी कथितपणे अमेरिकेकडून सुरू असणाऱ्या रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

सुरक्षेच्या हमीशिवाय कुठलीही स्पष्टता नसल्यास अमेरिका युक्रेनला भूभागावरून फसवणूक करण्याची शक्यता आहे असं फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी म्हटलं. तर येणाऱ्या काळात तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिका तुमच्या आणि आमच्या दोघांसोबत गेम करत आहे असं जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्ज यानी झेलेन्स्की यांना म्हटलं. यावर गोपनीयतेचा हवाला देत जर्मन चांसलर कार्यालयाने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. लीक झालेल्या कॉल रेकॉर्डमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय उद्योगपती स्टीव विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याबाबतही साशंकता वर्तवली, जे अलीकडेच क्रेमलिनला गेले होते. 

दरम्यान, फिनलँडचे राष्ट्रपती अलक्झेंडर स्टब यांनी आम्ही युक्रेन आणि व्होलोडिमिर यांना या लोकांसह एकटे सोडू शकत नाही असं म्हटलं. या लीक कॉलमध्ये NATO चे सेक्रेटरी जनरल मार्क रूट यांचाही उल्लेख झाला आहे. ज्यांनी त्यांनी नेत्यांना युक्रेनच्या हिताचं रक्षण करायला हवे असं आवाहन केले आहे. एका नाटो अधिकाऱ्यांनी या लीक कॉलवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Leaked call reveals distrust: Is America playing games with Europe?

Web Summary : A leaked call suggests European leaders distrust US efforts to resolve the Russia-Ukraine conflict. German Chancellor warns Zelenskyy about potential American deception. Doubts surface regarding Trump's associates' Kremlin visits, fueling transatlantic tensions.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प