शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

IndiGo: विमान रद्द झाल्याचं कळवलं नाही, राहण्याचीही सोय नाही; इंडिगोच्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 10:32 IST

IndiGo Flight Cancelled News: इंडिगोने गुरुवारी एकाच दिवसात ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली.

भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने गुरुवारी (४ डिसेंबर) एकाच दिवसात ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. याचा परिणाम हजारो प्रवाशांवर झाला. इंडिगोने २० वर्षांत एकाच दिवसात रद्द केलेल्या उड्डाणांची ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी इंडिगोच्या भोंगळ कारभारावर टीका केली.

इंडिगोच्या गोंधळामुळे झालेल्या त्रासाबाबत बोलताना एका तरुणीने संताप व्यक्त केला. ती म्हणाली की, "इंडिगोकडून विमान रद्द करत असल्याची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला देण्यात आली नव्हती. आम्ही पहाटे ५ वाजल्यापासून जागे आहोत आणि जवळपास दोन तासांपासून विमानतळावर येऊन थांबलो आहोत. आम्हाला कोणतीही माहिती दिली जात नाहीये, आम्ही गेल्या अनेक तासांपासून रांगेत उभे आहोत. आम्हाला लग्नाला जायचे आहे, पण आम्हाला उद्या दुसऱ्या विमानाने पाठवले जाणार असल्याचे इंडिगोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, इंडिगोकडून आमची राहण्याची सोय करण्यात आली नाही."

एकाच दिवसात ५५० हून अधिक उड्डाणे रद्द

इंडिगोने गुरुवारी ५५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. यापैकी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर सुमारे १७२ उड्डाणे रद्द करण्यात आली. मुंबई विमानतळावर आणखी ११८ उड्डाणे रद्द करण्यात आली. याचबरोबर बेंगळुरूमध्ये- १००, हैदराबादमध्ये- ७५, कोलकातामध्ये- ३५, चेन्नईमध्ये- २६ आणि गोव्यात ११ उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, देशातील इतर विमानतळांवरही इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. एअरलाईनच्या सेवा व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

इंडिगोने मागितली माफी

इंडिगोच्या निवेदनात म्हटले आहे की, "गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या नेटवर्कमध्ये व्यत्यय आला आहे. आम्ही आमच्या प्रवाशांना त्यांच्या नियोजित उड्डाणांमध्ये कोणत्याही बदलांची माहिती देत ​​आहोत आणि त्यांना अपडेट राहण्याचा सल्ला देण्यात आला." तर, इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर अल्बर्ट यांनी प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : IndiGo cancels flights, leaves passengers stranded; outrage ensues.

Web Summary : IndiGo cancelled over 550 flights, causing chaos. Passengers faced delays, lack of communication, and accommodation issues. One passenger lamented missing a wedding due to rescheduling. The airline CEO apologized for the disruptions.
टॅग्स :Indigoइंडिगो