महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 01:27 AM2020-06-07T01:27:33+5:302020-06-07T01:31:12+5:30

आवश्यक कामे करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश 

The Mayor-Commissioner inspected the sanitation in the city; Vigilance in the wake of last year's floods | महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता 

महापौर-आयुक्तांनी केली शहरातील नालेसफाईची पाहणी; गेल्या वर्षीच्या पुराच्या पार्श्वभूमीवर सतर्कता 

googlenewsNext
ठळक मुद्देझालेले काम समाधानकारक असून यंदा पुराचा धोका त्यामुळे कमी झाल्याचा महापौरांचा दावा  गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे आला होता शहरात पूर

पुणे : महापालिकेकडून पावसालापूर्व कामांचा आढावा घेण्यात येत असून आंबील ओढ्यासह शहरातील विविध भागांतील नालेसफाईच्या कामांची महापौर मुरलीधर मोहोळ, पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. झालेले काम समाधानकारक असून यंदा पुराचा धोका त्यामुळे कमी झाल्याचा दावा महापौर मोहोळ यांनी केला आहे.
 गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे शहरात पूर आला होता. चौदा किलोमीटरच्या आंबील ओढ्यासह सिंहगड रस्ता, वारजे, कोंढवा, वानवडी, हडपसर आदी भागातील नाल्यानाही पूर आला होता. या पुरात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच २८ पेक्षा अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. नाले दुरुस्ती, नाले सफाई, ड्रेनेज सफाईसह पावसाळी वाहिन्या स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
 गेले वर्षभर पूरग्रस्त नागरिकांनी मदत, दुरुस्ती संदर्भात तसेच सुरक्षेबाबत आंदोलने, निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या मुख्यसभेतही याविषयी जोरदार चर्चा झाली होती. याविषयी अद्यापही नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. यंदा पालिकेने खबरदारी घेत नाले सफाईवर भर दिला आहे. शहरातील ड्रेनेज, पावसाळी वाहिन्या सफाईवर लक्ष देण्यात येत आहे. तरीही या कामाविषयी आक्षेप नोंदवले जात आहेत. पावसाळ्यात पुन्हा पुरा येऊ नये, कामाचा दर्जा तपासणे आणि आवश्यक कामे करून घेण्यासाठी प्रशासनाचा ठेकेदारावर वचक असणे आवश्यक आहे.
 त्यादृष्टीने महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनू गोयल, नगर अभियंता प्रशांत वाघमारे आदी अधिका?्यानी पाहणी केली. कात्रजपासून धनकवडी, सहकारनगर, अरण्येश्वर, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूल, आंबील ओढा वसाहत ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत पाहणी करण्यात आली. यासोबतच भवानी पेठ परिसर, मध्यवस्तीचा आणि बाणेरसह पश्चिम भागाची पाहणी केली. यावेळी पाहणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी दूर करणे, अनुषंगिक कामे करण्याचे आदेश संबंधीत अधिका?्यांना देण्यात आल्याचे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. 
--------- 
पालिका पदाधिकारी, आयुक्त आणि अन्य अधिका?यांसोबत नाले सफाईच्या कामाचा प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सगळे काम समाधानकारक असून यंदा त्यामुळे पुराचा धोका कमी झाला आहे. आवश्यक कामे करण्यावर भर दिला जात असून पुणेकरांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर
 --------- 
आंबिल ओढ्यामध्ये झालेली अतिक्रमण आणि बांधकाम यांचा फटका सहकारनगर परिसराला बसला असून ९ महिने झाले तरी सुद्धा आंबिल ओढ्यातील कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी कार्यकर्त्यांसह महापौरांच्या दौ?यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याची तयारी केली होती. परंतु, आंदोलक उभे असलेल्या ठिकानाकडे जाणे या पथकाने टाळले. या कामात ३८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. 

Web Title: The Mayor-Commissioner inspected the sanitation in the city; Vigilance in the wake of last year's floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.