सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:29 IST2026-03-24T12:28:08+5:302026-03-24T12:29:05+5:30

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये (पॉक्सो) २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली

Marriage despite in-laws' knowledge; After child marriage was prevented, the type of abuse against the minor girl was revealed | सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड

सासरच्यांना माहित असूनही विवाह; बालविवाह रोखल्यानंतर अल्पवयीन मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार उघड

पुणे : बाल विवाह रोखल्यानंतर सासूरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली.

तक्रारदार अल्पवयीन युवतीचा विवाह एका तरुणाशी निश्चित करण्यात आला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती सासरकडील मंडळींना होती. अल्पवयीन युवतीचा विवाह करण्यात येत असल्याची माहिती ‘चाइल्ड हेल्पलाइन’ या स्वयंसेवी संस्थेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने विवाह रोखण्यात आला. नोव्हेंबर २०२५ मध्ये तरुणाच्या वडिलांनी युवतीला सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील घरी नेले. लोणंद येथे दोन महिने युवती राहिली. दरम्यान, बालविवाह रोखल्यानंतर युवतीला सासरकडील मंडळींनी पुन्हा नांदण्यास नेले असल्याची माहिती ‘चाइल्ड हेल्पलाइन’ला मिळाली. स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिची तेथून सुटका केली. त्यानंतर युवतीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. युवती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर युवतीने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये (पॉक्सो) २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक शैला पाथरे पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : बाल विवाह रोका गया, नाबालिग लड़की से दुष्कर्म; पुणे में एक गिरफ्तार

Web Summary : पुणे: बाल विवाह रुकने के बाद भी ससुराल वालों को नाबालिग जानकर लड़की को ससुराल भेजा गया। फिर उसके साथ दुष्कर्म किया गया। लड़की की शिकायत पर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया।

Web Title : Child Marriage Stopped, Minor Girl Abused; One Arrested in Pune

Web Summary : Pune: Despite knowing she was underage, a girl was sent to her in-laws after a child marriage was stopped. She was then abused. Police arrested the accused after the girl filed a complaint.