मंचरला चार हाॅटेलवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:04 IST2021-02-05T05:04:36+5:302021-02-05T05:04:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर : आरटीआय कार्यकर्ता म्हणवून घेणारा हरीश महादू कानसकर यांच्या हॉटेलवर हॉटेल व ढाबा व्यावसायिकांची ...

Manchar raided four hotels | मंचरला चार हाॅटेलवर छापा

मंचरला चार हाॅटेलवर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर : आरटीआय कार्यकर्ता म्हणवून घेणारा हरीश महादू कानसकर यांच्या हॉटेलवर हॉटेल व ढाबा व्यावसायिकांची वसुली मक्तेदारी असलेल्या हॉटेलवर कारवाई केली. अवैधरित्याविक्री होणाऱ्या १९ हजार ७८७ रुपये किमतीचा देशी-विदेशी दारुचा साठा व गुटखा ताब्यात घेतला असून सहा जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व भागातील सूर्या हॉटेल (गांजवेवाडी, वळती, ता. आंबेगाव), रानवारा हॉटेल (पारगाव, ता. आंबेगाव), केतन हॉटेल (पारगाव, ता. आंबेगाव), सूर्या गार्डन हॉटेल (शिंगवे फाटा, ता. आंबेगाव) या चार हॉटेलवर मंचर पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून एकाचवेळी चार पथके नेमून हॉटेलवर छापा मारण्यात आला. या छाप्यामध्ये पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक सागर खबाले, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, राजेंद्र हिले, नीलेश खैरे, पोलीस जवान विठ्ठल वाघ व अन्य सहकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये आरटीआय कार्यकर्ता हरीश महादू कानसकर हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर विजय मुळे, नितीन ढोबळे, विक्रांत चांगण, रवींद्र ढोबळे, विकास वाळूंज, भरत ढोबळे यांना मंचर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Manchar raided four hotels