‘‘सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी, त्यांना उपमुख्यमंत्री करा...’’; नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:11 IST2026-01-29T20:10:17+5:302026-01-29T20:11:14+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

"Make Sunetra Bahini the Deputy Chief Minister..."; Narhari Jirwal clearly stated | ‘‘सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी, त्यांना उपमुख्यमंत्री करा...’’; नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

‘‘सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी, त्यांना उपमुख्यमंत्री करा...’’; नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आणि खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत भाष्य केले. नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. सुनेत्रा वहिनींच्या मंत्रिमंडळ सहभागासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे सांगितले.

मोठी बातमी! जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या, नव्या तारखेची घोषणा

बारामतीमध्ये झिरवाळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी झिरवाळ म्हणाले, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली असेल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहे,’ ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी होती. आता ही मागणी आणखी जोरकसपणे होईल. कारण, असे विखुरलेले राहून चालणार नाही. एकत्रच राहावे लागणार आहे, हे आपले विचार आहेत. तसेच सर्वसामान्यांचेही हेच विचार आहेत. 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे ही जनतेची ईच्छा

यावेळी माजी आमदार नवाब मलिक यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत भाष्य केले. मलिक म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कल्पना नाही. पण, ही जनतेची ईच्छा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.’

Web Title : सुनेत्रा पवार को राकांपा संभालनी चाहिए, बनें उप मुख्यमंत्री: नरहरि झिरवाल

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, सुनेत्रा पवार को राकांपा का नेतृत्व करने और उप मुख्यमंत्री बनने की मांग बढ़ी। नेता दोनों राकांपा गुटों को एकजुट करने पर चर्चा कर रहे हैं, जो एकता के लिए जनता की इच्छा को दर्शाती है।

Web Title : Sunetra Pawar should handle NCP, be Deputy CM: Narhari Zirwal

Web Summary : Following Ajit Pawar's death, calls grow for Sunetra Pawar to lead NCP and become Deputy CM. Leaders discuss unifying both NCP factions, echoing public desire for unity.