पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकूण १११ शिक्षकी पदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना ॲकेडमिक ॲण्ड रिसर्च क्रेडेन्शियल व लागू असल्यास किमान १२०/७५ गुणांचा रिसर्च स्कोअर (एपीआय) आवश्यक कागदपत्रांसह जमा करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मूळ अर्जदारांना त्यांच्या अर्जात ऑनलाइन बदल/सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाकडून अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानुसार ५ मेपर्यंत अर्जात सुधारणा करता येणार आहे.
या संधीचा लाभ घेत सर्व मूळ अर्जदारांनी त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल/सुधारणा करावी. सुधारित अर्जाची प्रत तसेच ATR व API ची प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठ कार्यालयात स्वाक्षरीसह प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करावे. यासाठी दि. ०९ मे २०२६ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदर वाढीव मुदतीत उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार नाही.
याबाबतचे सविस्तर शुद्धीपत्रक विद्यापीठाच्या admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदरची संधी अंतिम आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर माहिती भरून उमेदवारी सुनिश्चित करावी, असे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.
Web Summary : Pune University allows professor applicants to revise applications by May 5th. Submit updated forms with required documents to the university administration by May 9th. No new applications are permitted during this extension, says Registrar Dr. Prafulla Pawar. Details available on the university website.
Web Summary : पुणे विश्वविद्यालय ने प्रोफेसर पद के आवेदकों को 5 मई तक आवेदन संशोधित करने की अनुमति दी है। अपडेटेड फॉर्म आवश्यक दस्तावेजों के साथ 9 मई तक विश्वविद्यालय प्रशासन को जमा करें। इस विस्तार के दौरान कोई नया आवेदन स्वीकार नहीं किया जाएगा, रजिस्ट्रार डॉ. प्रफुल्ल पवार ने कहा। विवरण विश्वविद्यालय की वेबसाइट पर उपलब्ध हैं।